Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

प्रस्तावना 

चिमाजीअप्पा ग्वालेरीपर्यंत हिंदुस्थानांत जाऊन मांडोगडची स्वारी करून जूनांत देशीं परत आले. १७३१ च्या एप्रिलांत संभांजीशीं तह झाला. १७३१ च्या डिसेंबरपर्यंत दोघे बंधू पुणें व सातारा येथें देशींच होते. १७३२ च्या जानेवारी-फेब्रुवारींत बाजीराव कुलाब्यास गेला होता. तेथून माळव्यांत जाऊन स्वारी आगोठीस देशीं आली. १७३२ च्या जानेवारीपासून जुलैपर्यंत फत्तेसिंग भोसले निजामावर गेले होते. १७३२ च्या डिसेंबरांत बाजीराव निजामाच्या भेटीस गेला, ती १७३३ च्या मार्चात परत आला. १७३२ च्या आक्टोबरांत चिमाजीअप्पा बुंदेलखंडांत जाऊन चापानेर सर करून, १७३३ च्या जुलैंत परत आला. १७३३ च्या मार्चात बाजीराव व फत्तेसिंग भोसले कोंकणांत जजि-यावर गेले ते डिसेबरांत परत आले. चिमाजीअप्पा १७३४ च्या मार्चात कोकणांतून परत आला. १७३४ च्या जानेवारींत बाजीराव खानडौरावर दिलीपर्यंत चालून जाऊन जुलैंत परत आला. चिमाजी १७३४ च्या मार्चापासून जुलैपर्यंत व-हाड खानदेशांत होता. १७३४ च्या नोव्हेंबरापासून १७३५ च्या जुलैपर्यंत पिलाजी जाधवाची स्वारी हिंदुस्थानांत कमरुद्दीन वजिरावर झाली. १७३४ च्या जुलैपासून १७३५ फेब्रुवारीपर्यंत पुणें, सातारा वगैरे स्थलीं राहून बाजीरावाची स्वारी १७३५ च्या फेब्रुवारींत कुलाव्यास गेली. ह्याच स्वारीस गोवळकोटची स्वारी असें म्हणतात. ह्या स्वारीहून पेशवे आगोठीस परत आले. १७३४ च्या जुलैपासून १७३६ च्या मार्चापर्यंत चिमाजी देशींच होता. १७३५ च्या नोव्हेंबरांत बाजीराव हिंदुस्थानांत अजमीरपर्यंत जाऊन १७३६ च्या जुलैंत परत आला. १७३६ च्या मार्चांत चिमाजी कोंकणांत जाऊन १७३६ च्या जूनांत परत आला. १७३६ च्या नोव्हेंबरांत बाजीराव पुन: हिंदुस्थानच्या स्वारीस निघाला तो १७३७ च्या जुलैंत परत आला. हीस भेळशाची स्वारी म्हणतात. चिमाजीअप्पा १७३६ च्या मार्चापासून जुलैपर्यंत कोंकणांत होते. बरोबर मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे व पवार होते. १७३७ च्या आक्टोबरापासून १७३८ च्या जुलैपर्यंत बाजीरावानें भोपाळची स्वारी केली. १७३७ च्या नोव्हेंबरापासून १७३८ च्या जुलैपर्यंत चिमाजी तारापूर-साष्टीकडे होता. १७३८ च्या नोव्हेंबरांत चिमाजी व बाजीराव वसईच्या स्वारीस निघून १७३९ च्या मार्चांत बाजीराव खानदेशांतून नागपूराकडे आवजी कवड्याचा सूड उगविण्याकरितां जात असतां नादीरशहानें दिल्ली लुटल्याची खबर आली. चिमाजी वसई सर करून व बाजीराव दिल्लीच्या पातशहाच्या मदतीची तयारी करण्याकरितां १७३९ च्या जुलैंत देशीं परत आले. बाजीराव व चिमाजीअप्पा नासरजंगावर १७३९ च्या नोव्हेंबरांत जाऊन त्याला १७४० च्या मार्चांत पक्का नरम आणून, बाजीराव अवरंगाबादेवरून खानदेशाकडे गेला व चिमाजी बाळाजी बाजीरावाला घेऊन कोंकणांत मानाजी आंग्र-याच्या साहाय्यास गेला. बाजीराव २८ एप्रिल १७४० त रघूजी भोंसल्याचें पारपत्य केल्याशिवाय व हिंदुस्थानची निरवनिरव केल्याशिवाय वारला. ही बातमी चिमाजीअप्पास कोंकणांत कळली.