Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
ज्या लोकांची चरित्रें लिहिण्याचे आह्मी योनिलें आहे, त्या सर्वांत जिजाबाईस मुख्य स्थान दिलें पाहिजे. फार प्राचीन कालापासून महाराष्ट्रांत प्रसिद्ध असलेल्या यादवे घराण्यांत जिजाबाईचा जन्म झाला असून तिचा बाप त्यावेळचा एक मोठा मानी मराठा सरदार होता. जिजाबाईच्या लग्नाची हकीगत फार मौजेची आहे. ह्या हकीगतीवरून त्या वेळच्या लोकांचा मानी आणि करारी स्वभाव पूर्णपणें व्यक्त होतो. एकेवेळीं मालोजीचा मुलगा शहाजी व जिजाबाई हीं दोन लहान मुलें गमतीने खेळत होतीं. त्यांच्या त्या खेळाचें कौतुक पहात असतां जिजाबाईचा बाप जाधवराव मालोजीस सहजगत्या ह्मणाला ‘ पहा हा जोडा किती नामी दिसतो.' मालोजीनें ही गोष्ट लक्षांत ठेऊन जिजाबाईस मागणी घातली. मालोजीसारख्या कमी दर्ज्याच्या मराठ्याच्या मुलास आपली मुलगी द्यावी ही गोष्ट जाधवराव यास न रुचून त्यानें जिजाबाईस शहानीस देण्याचें नाकारलें. मालोजीस हा अपमान अगदी सहन झाला नाहीं. जाधवरावाच्या बळाबळाचा विचार न करतां जाधवरावाचा गर्वपरिहार करण्याच्या उद्योगास तो लागला व शेवटीं जाधवरावासही त्याणें आपलें वचन खरें करण्यास लावलें. केवढें हें धैर्य आणि काय हा स्वाभिमान ! जाधवराव जसा आपला संबंध देवगिरीच्या यादव राजघराण्याशी जोडी, तसा शहाजीही उदेपूरच्या रजपूत राजघराण्याशीं आपला संबंध जोडित असे. जिजाबाई थार कुलांत उत्पन्न झाली होती व तिचा शरीरसंबंधही थोर घराण्याशी झाला होता. पण एवढ्याच गोष्टीवर तिची थोरवी अवलंबून नव्हती. तिच्या थोर पणास तिच्या आंगचे गुणच कारण होते. ती यःकश्चित् कुलांत उपजती तरीही तिचे अलौकिक गुण झांकतेना. मालोजीनें केलेला पाणउतार जाधवरावाच्या मनांत एकसारखा डांचत होता. त्या वेळेपासून भोसल्याचा तो नेहमीं हेवा करी. पुढें काही दिवसांनी अहमदनगर व दौलताबाद या दोन दरबारांतील सर्व कर्तुमकर्तु' शक्ति जेव्हां शहाजीच्या हातीं आली, तेव्हां तर जाधवरावाच्या हृदयांत फार दिवस धुमसत असलेला हा मत्सराग्नि अधिकच भडकला. मोंगलास मिळून त्याणें शहाजीस अहमदनगरच्या बचावाचें काम सोडून देण्यास भाग पडलें शहाजीनें निरुपायानें आपली बायको जिजाबाई इला तिच्या बापाच्या कैदेंत एकटी सोडून विजापूरची वाट धरली, पण जाधवरावानें त्याचा पाठलाग करण्याचें सोडलें नाही. जिजाबाईवर तर हें एक मोठें संकट येऊन गुदरलें. त्या वेळीं तिला दुसरा कोणाचाही आसरा नव्हता. त्यामुळें स्वतःच्या हिमतीवरच तिला दिवस काढावे लागले. असे दिवस काढीत असतां पारतंत्र्यामुळें होणा-या अपमानांचा तिला पूर्ण अनुभव आला. त्यातून याचवेळीं ती शिवनेर येथें बाळंत झाली व तिच्या पोटीं शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या बाळ शिवाजीच्या जिवावर जिजाबाई आपली सर्व दुःखें विसरली. ज्या देवी भवानीनें ऐन आणीबाणीचे वेळीं तिच्या व तिच्या लहान अर्भकाच्या प्राणाचें संरक्षण केलें, त्या देवी भवानीवर पूर्ण विश्वास ठेऊन तिनें शिवाजीस लहानाचा मोठा केला. पुढें काहीं दिवसांनी शहानीस विचारून जिजाबाई पुण्यास जाऊन राहिली. दादोजी कोंडदेव या वेळी शहाजीच्या पुणें प्रांतांतील जहागिरीची व्यवस्था पहात होता. पुण्याच्या आसपासच्या डोंगराळ व पहाडी प्रदेशांत शिवाजीचा लहानपणाचा बहुतेक काळ गेला असल्यानें, शिवाजी मोठा काटक, सोशिक व धाडशी झाला होता. शिवाय जिजाबाईनेंही दिवसकाळ जाणून त्यास अशाच प्रकारचें शिक्षण दिलें होतें. शिवाजीचें जिजाबाईवर अतोनात प्रेम असे. त्याचा बाप शहानी विजापूर तंजावराकडे असल्यामुळें जिजाबाईचाच त्याम नेहमीं सहवास असे. प्रत्येक गोष्टींत तो जिजाबाईची सल्ला घेई.