Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)
जिजाबाईनें शाबासकी दिली की, केलेल्या सर्व श्रमाचें सार्थक झाले असें त्यास वाटे व नवीन स्वा-या, शिकारी करण्यास त्यास अधिक हुरूप येई. जिनाबाईनें मांडीवर घेऊन पाजलेल्या गोड उपदेशामृतामुळेंच तो इतका धार्मिक बनला होता. जिजाबाईनें पाजलेल्या बाळकडूनेंच स्वकर्तव्याची त्यास पूर्ण ओळख करून दिली होती. जिजाबाई शिवाजीकडून नेहमीं भारतरामायणांतील युद्धकथा ऐकवीत असे. शहाजी मेला तेव्हां जिजाबाईनें सती जाण्याची तयारी केली. पण शिवाजीनें तिची अतिशय विनवणीकरून तिचा तो बेत फिरविला. शिवानी दिल्लीस गेला तेव्हां मागें जिजाबाईकडेच त्याणें सर्व राज्यकारभार सोंपविला होता. कोणत्याहि अवघड कामगिरीवर जावयाचें असलें ह्मणने शिवानी प्रथम जिजाबाईचा आशीर्वाद घेई. जिजाबाईही ‘ परमेश्वर तुझा पाठीराखा आहे, तो तुला यश देईल' असा त्यास धीर देऊन त्यास त्या कामगिरीवर जाण्यास निरोप देई. आई ज्याप्रमाणें मुलाच्या कोमल अंतःकरणावर उपदेशाचा ठसा उमटवील, त्याप्रमाणें मुलें बरीं वाईट निपजतात असा साधारण सिद्धांत आहे. आईनें दिलेल्या शिक्षणामुळेंच नेपोलियनादि नररत्नें वैभवास चढली. शिवाजी जो इतका उदयास आला त्यास कारण तरी बहुतांशीं त्याची आई जिजाबाईच होय. शिवाजीच्या आंगीं जें जें अलौकिक गुण होते, ते ते प्रायः त्यास जिजाबाईपासून प्राप्त झाले होते. जिजाबाईसारखी आई शिवाजीस मिळाली नसती, तर शिवाजीचें नांव आन पृथ्वीवर दुमदुमलें नसते.
जिजाबाईप्रमाणेंच दादोजीकोंडदेवाच्या शिक्षणाचाही शिवाजीच्या एकंदर अयुष्यक्रमावर बराच परिणाम घडला. दादोजीकोंडदेव हा पुणेप्रांतातील माळथान गांवीं जन्मला होता. त्याणें बरेच ठिकाणीं नोकरी केली असून यावेळीं हा पुणें प्रांतातील शहाजीच्या जहागिरीची व्यवस्था पहात होता. शहाजी कर्नाटकप्रांतीं असल्यानें शिवाजीच्या शिक्षणावर नजर ठेवण्याचें काम दादोजीकोंडदेवाचेंच शिरावर पडले. शहाजी हजर असता तर त्याणें जितक्या प्रेमानें व कळकळीनें शिवाजीस शिकविलें असतें तितक्या किंबहुना त्याहूनही कांकणभर जास्त कळकळीनें व प्रेमानें दादोजी कोंडदेवानें शिवानीच्या शिक्षणाबद्दल काळजी घेतली. दादोजीकोंडदेवाच्या तालमींत शिवाजी तयार झाला होता, म्हणूनच महाराष्ट्राची मुक्तता करण्याचें काम त्याचे हातून पार पडण्यास मोठी मदत झाली. दादोजी कोंडदेव मोठा विचारी चौकस व जपून वागणारा होता. शिवाजीचा उनाडपणा त्यास बिनकुल आवडत नसे. तथापि त्याचे शिवाजीवरील प्रेम काडी इतकेंही कमी झालें नाहीं. पुढें पुढें तर त्यास असें वाटू लागलें की सामान्य मनुष्यास लागणा-या कसानें शिवाजीची परिक्षा करतां कामानये. तरुण शिवानीच्या मनांत ने विचार, व ज्या कल्पना रात्रंदिवस घोळत होत्या, ते विचार व त्या कल्पना यद्यपि सिद्धीस गेल्या नाहींत, तरी त्या सिद्धीस नेण्याचा प्रयत्न करणें कांहीं कमी यशस्कर नाहीं अशी दादोजीची हळूहळू खात्री होत चालली. दादोजीसारख्या शिक्षकाचा वचक नसता, तर शिवाजीचा उच्छृंखलपणा बेताल झाला असता. दादोजी कोंडदेवानें जरूर तेवढी राजनीति व युद्धनीति ही शिवाजीस शिकविली होती. भिकार रेम्याडोक्या मावब्यांना व मराठ्यांना शूर लढवय्ये कसे बनवावेत व त्यांवर आपली छाप कशी ठेवावी वगैरे अमेलिक कलाही शिवानीस दादोनीकडूनच । मिळाल्या होत्या. राज्यकारभारांत तर दादोजीचा हात धरणारा कोणीच नव्हता. शहाजीच्या जहागिरीची देखरेख दादोजी कोंडदेवाकडे येण्यापूर्वी तींत फारच अव्यवस्था होती. दुष्काळामुळें लोक अन्नास महाग झाले होते. जहागिरीच्या सरहद्दीवर मोंगलांचे व विनापूर बादशहांचे तंटे सारखे सुरू असल्यानें बहुतेक मुलूख उजाड झाला होता. लांडग्यांच्या व चोरट्यांच्या त्रासामुळें शेतीभाती करणें अत्यंत कठीण झालें होतें. प्रत्यक्ष पुणेंही ओसाड पडलें होतें. दादोजीकडे व्यवस्था येतांच त्यानें ही सर्व बंडाळी एकदम मोडली. बक्षिसें वगैरे लावून सर्व लांडगे मारविले. चोरट्यांचा बीमोड करून टाकला. यामुळें जहागिरींतील सर्व खर्च भागून हळूहळूशिल्लक पडूं लागली. जसजशी शिल्लक वाढत गेली तसतसें दादोजीनें सैन्य वादविलें. नवीन बारगीर ठेविले. किल्यांची डागडुजी केली व त्यांच्या संरक्षणार्थ शिबंदी ठेवली. याप्रमाणें जहागिरींत सर्वत्र शांतता होऊन लोकांच्या प्राणाचें व वित्ताचें योग्य संरक्षण होऊन गेल्यानें पुणें, सुपें, बारामती इंदापूर व मावळ वगैरे जहारींतील सर्व परगण्यांतील लोक आनंदाने नादू लागले. बागायताचें पीक अधीक होउं लागले. फळ झाडाची लागवड वाढली. शिवापूर येथें आज मितीस आढळणाच्या बागा दादोजी कोंडदेवाचे वेळींच तयार झालेल्या आहेत. या बागा पाहिल्या ह्मणने दादोजी कोंडदेवाच्या शहाणपणाची बरोबर साक्ष पटते. दादोजीचा अमल फारच करडा होता. त्यास एक वेळ आपल्या धन्याच्या ह्मणने शहानीच्या बागेंतील एक आंबा तोडावा अशी इच्छा झाली. त्याबरोबर धन्याच्या परवानगी वांचून त्याच्या बागेंतील आंबा तोडण्यास सरसावलेला आपला उजवा हात एकदम तोडून टाकण्यास त्याणें जवळ असलेल्या लोकांस फर्माविले. जवळच्या लोकांनी त्याचें एकलें नाही. त्यास चार गोष्टी सांगून त्यांणीं त्याच्या हाताचे संरक्षण केलें. पण हा पापी हात लोकांस नेहमीं दिसावा ह्मणून त्या हातांत तो अस्तनी घालीनासा झाला. पुढें शहाजीच्या सांगण्यावरून त्याणें हा वेडेपणा सोडला. शहाजी, मालोजी प्रमाणें शिवाजीस एक मोठा बलाढ्य मराठा सरदार करावा एवढीच दादोजीची इच्छा होती. प्रमुख मराठे सरदारांत एकी करून मोंगलाच्या त्रासांतून स्वदेशास सोडवावें ही कल्पना शिवाजीप्रमाणें त्यावेळी दादोजीच्या मनांत आली नव्हती. पण हें महत् कार्य शेवटास नेण्यासारखी शिवाजीच्या अंगीं योग्यता आहे अशी जेव्हां त्याची खात्री झाली, तेव्हां त्यानें आपला आग्रह सोडला व शेवटीं ‘ आरंभलेल्या सत्कार्यात तुला जय येवो।' असा शिवाजीस आशीर्वाद देऊन त्यानें आपला देह ठेविला. जमीन महसूलाच्या, तसेंच राज्यव्यवस्थेच्या बाबींत शिवाजीनें दादोजीचेंच वळण उचललें होतें. फार काय, आमच्या या उल्लू शिवाजीम दादोजीसारखा धूर्त वाटाड्या मिळाला नसता तर शिवाजीच्या हातून स्वराज्यवृक्षाची लागण कदाचित् झाली नसती; निदान त्या राज्यवृक्षास इतका चिरस्थायीपणा तर खास आला नसता.