Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ८१. १७१४ पौष शुद्ध १४.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री धोंडोपंत स्वामीचे सेवेसी.
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें विशेष मौजे मदनसुरी पा निलंगे ही गांव इस्ताव्या प्रा मख्यानें पा मारचे सरदेशमुखीचे ऐवजी तुह्माकडे जागिरीकडील माजी आमलदार महमद फतहुलाखां-बाहादूर याणी करार करून दिल्हा खान-मार यांजकडे आमल तोपावेतो मौजे मारची वहिवाट करार-बमोजीब तुह्माकडे जाली सांप्रत खान-मार यांजकडून आमीलीचे काम तगीर होऊन राजश्री जिवाजी बाबूराव यांजकडे जाले देहबदेही कचा आमल करण्याची ताकीद याजकरितां मंदनसुरी हा गांव सरदेशमुखाकडून यांचे यांजकडे देवावा सरदेशमुखीचे मामलतीचा सालाबाद मामुल-प्रा सन १२०१ पावेतो फडच्या जालाच आहे पुढे सन १२०२ पासोन माहली आमल वाजबी घ्यावा गांव मोकळा करून घ्यावी या प्रा नवाब शमषुल उमरा- बाहादूर याणी आह्माकडे सांगोन पाठविले त्यावरून लिहिले असे त्यास फतुलाखान याजपासोन मख्याने गांव तुह्मी मामलतीचे ऐवजात घेतला करारा प्रा खान-मार यांचे आमलपावेतो वहिवाट होणे जसी जाली हली नवे आमलादाराकडे गांव सोडून देण्याविषई यांचे ह्मणे त्या पक्षीं मौजे-माराकडे बाकी जमीदाराचे रुईनें असेल ती रुजू करून घेऊन गांव यांचे यांजकडे वागु-जास्त करावा मामलतीचा सुदामत मामुल-प्रा सन १२०२ पावेतो फडच्या करून घ्यावा रा छ १२ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे है विनंति.