Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
जिवाजी बाबूराब आमील निलंगेकर लेखांक ७८. १७१४ पौष शुद्ध १३.
याणी पत्रें मागितली सबब नारायणराव
पांढरे व धोंडो मल्हार निा सरदेशमुख
यांचे नावें दिल्ही छ ११ जावल.
राजश्री नारायणराव पांढरे शाहमतमुलुक गोसावि यासि.
अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित आसावें विशेष राजश्री मानसिंगराव पांढरे तुमचे भाऊ याचा तुमचा कजिया याजकरितां मारनिलेनी पा निलंगे एथील मौजे सांगवी व हतरगें या दोन गांवची गुरें बकरी वगैरे मवेसी नेली येविषईचा बोभाट नबाबाचे सरकारांत आला त्यास तुमचा व मानसिंगराव यांचा भाऊ-पण्या समंधे कजिया असेल तो आपले घरी समजावा तालुक्याची मवेसी नेऊन उपसर्ग देण्याचें होऊ नये पा मारचें मोकाशाचे मामलतीचा मामुल-प्रा सालाबाद वहिवाट चालत आल्या बमोजीब फडच्या करून घ्यावा गांवची मवेसी नेली असेल ते माघारी देऊन पुढे तालुकियास गैरवाजवी उपसर्ग न लागे तें करावें मामलतीचा फडच्या सुरळीत होत असतां गांवास उपद्रव करून गुरें वगैरे मवेसी नेल्याचा बोभाट येऊ नये रा छ ११ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.