Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

बाब बापूराव व्यंकटेश गदवालकर                                                   लेखांक ८४.                                                         १७१४ पौष वद्य २.
याचा छ १५ जावल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाबूराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहीत असावे विशेष तुह्मी पत्र पो ते पाऊन सविस्तर मार अवगत जाहला ऐवज रवाना करण्याविसी च्यार दिवस आळस जाला सारा च सांप्रत राजश्री बाळाजीपंत यांचे विद्यमाने व्याज मुदलसुधा ऐवज राजश्री भगवानदास मुरलीदास याचे दुकानीहून देविला आहे पावता होईल आह्मी आपले आहोंत व हें संस्थान देवाब्राह्मणाचे आहे पूर्ण अभिमान असावा ह्मणोन लिो ते सर्व समजलें ऐसियास साडेबारा हजार रू।। शेटजीनी पो बाकी रुपये लवकर पाठवावे ह्मणोन सांगावे संस्थानचे अत्यगवाद सर्व प्रकारे आहे याविषई उपरोधिक लिहिणे प्रयोजन नाही राजश्री कृष्णाजीपंत लिहितील त्याजवरून कळेल तुह्मी आपले चिरंजिवास आह्माकडे पाठविणार ह्मणोन राजश्री बाळाजी व्यंकटेश यांचे लिहिल्यावरून व कृष्णाजीपंत यांचे सांगण्यावरून कळले त्यास उत्तम आहे परंतु प्रस्तुत एथील हवा बिघडली आहे तुमचे चिरंजिवाची प्रकृत बहुत नाजूक आहे त्याजकरितां च्यार दिवस पाठऊ नये अमळसी हवा चांगली जालियावर चिरंजिवास पाठवावे चिरंजिवास घरी बसऊन ठेवल्याने तरबियत होणार नाहीं तरी त्यास श्रवण करवीत असावे रा छ १५ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.