Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
लेखांक ७२. १७१४ पौष शुद्ध १३.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहेरी-बहादूर
मुतहवरुद्दौला रोबजंग बहरुलमुलूक गोसावी यांसी-
सकलगुणालंकरण अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसिर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असलें पाहिजे विशेष पा अफजलपूर तालुके पागा एथें तुह्माकडील लोकांनीं उपद्रव करून गांव लुटून नेले व एक गावचे पाटलास जखमी करून वस्तभाव नेली याचा बोभाट पागेकडे आला त्यावरून अजमलमुलूक बहादूर याणी हुजुरांत अर्जी केली त्याजवरून नवाब अजमुलउमरा बहादूर यांस व आह्मास ईर्षाद जाला कीं तुह्मी बहेरी-बहादूर यांस पत्रे लेहून पा मजकूरची याद आली आहे त्या प्रो जिनसा गांवकरास देऊन रसीद घेऊन पाठवावी व पुढें असी बेज्या हरकत न करीत असें करवावे त्याजवरून नवाब मवसूफ याणी पत्र लिहिलें आहे त्यास याउपरि आपलेकडील लोकास ताकीद करून मौजे आंकलगी वगैरे गांवची लूट आणिली आहे ते यादी प्रो देऊन रसीद घेऊन पाठवावी व पुढें लोकांस ताकीद पकी असावी की कोठे उपद्रव न करीत हालीं जासूदजोडी पा आहे याज बा मवेसीची रसीद लवकर पाठवावी पुन्हा असी गोष्ट आमलांत येणे ठीक नाही रा छ ११ जावल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.