Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
राजे व्यंकटपा नाईक यांस लेखांक २२९. १७१५ वैशाख शुद्ध १०.
पत्र मारनिलेचे वकिलासमागमे छ ९ सवाल.
राजश्री राजे व्यंकटपा नाईक बळवंत बहिरीबाहादूर गोसावि यांसि.
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य भो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत असावे विशेष तुह्मी पत्र राजश्री वेणु गोपाळ याजबराबर पाठविले ते पावले नवाबाचे सरकारचा ऐवज तुह्माकडोन येणे त्याऐवजी काही भरणा पुण्यात राजश्री गोविंदराव याजकडे करविला काहीं ऐवज आपल्यापासी भरणा करावयास साहुकार पाठविले आहेत ह्मणोन तपसिले लिहिले त्यास ऐवज किती पाठविला हे काहींच लिहिले नाहीं मोहगम सावकारास पाठविले भरणा करतील ऐसे लिो त्यास ऐवजी कामास ऐसे लिहिणे नसावे साहुकार मारनिलेस वेणु गोपाळ याचे रुबरू किती ऐवजाचा भरणा करितां हे विच्यारिलें त्यास यांचे ह्मणे साहासष्ट हजाराचा भरणा करूं परंतु साहुकाराचे बोलणे तीन महिन्यांत ऐवज आदा होईल आपले तर लिहिण्यात वायदा मुदत काहींच नाहीं नवाबाचे सरकारची निकड ऐवजाकरितां कसी आहे आठ महिने करारास होऊन गेले ऐवजास ठिकाण नाहीं नवाब बंदगानअली याची रुबुरु तुह्मी या कारभारात सबब इतके दिवस सुरापूरचे ऐवजाची बरदास्त केली इत्यादिक बोलणी जाल्याचा तपसील यापूर्वी इकडून जासूदजोडी समागमे लिहिण्यात आला आहे त्यावरून कळले असेल सारांश यांचे सरकारची निकड असी आपल्याकडून ऐवज येण्याचा प्रकार असा साहुकाराचे बोलणे याअन्वयें पाहतां कशास कांही मिळत नाही मातबर जाबसालाचे बोलण्यात पत राहणे हे सर्व गोष्टीचा उपयोग त्यास साहुकारास आह्मी सांगीतले की तीन महिन्याची मुदत ऐवजास तुह्मी ह्मणतां परंतु नाईकांचे पत्रांत नाही वायदा नाही त्याअर्थी साहुकारापासोन सासष्टहजार रुा नवाबाचे सरकारांतून घेतील बाकी ऐवजाची रवानगी लवकर करावी की बोलल्याप्रो सचोटी राहून पुढील जाबसालास नीट येविषीचा सर्व तपसील वेणु गोपाळ यांसी बोलण्यात आला मारनिले सांगतील त्यावरून कळेल सारांश ऐवज आधी येऊन पोहचावा इतक्यावर दिवसगत होऊ नये वेणु गोपाळ यांजला जाण्यास पांच दिवस येण्यास पांच दिवस दोन दिवस तेथे एकूण बारा दिवसात मारनिलेनीं लाख रुायांची तरतूद एथे सध्या ऐवज पोंहचावयाची करून यावी ऐसे सांगून पो आहे बारा दिवसपरियंत वाट पाहून येणे न आल्यास साहुकारास ऐवजाचा तगादा एथें होईल हे समजोन मारनिलेस लवकर रवाना करावे ऐवज रोख पोहचावा रा छ ९ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.