Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)
व्यंकटराम पिला याचे पत्राचा लेखांक २३२. १७१५ वैशाख शुद्ध १०.
जाब रा छ ९ सवाल सन १२०२.
राजश्री व्यंकटराम पिला गोसावि यांसि-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो गोविंदराव कृष्ण आसीर्वाद उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें विशेष तुह्माकडोन अलीकडे एक महिना दीड महिना होत आला पत्र येत नाही याचें कारण समजत नाही नवाब बंदगानअली याची स्वारी हैदराबादेहून छ ११ रमजानी किले बेदरास दाखल जाली आह्मी समागमेच मुकाममारी आलो तूर्त एथेच मुकाम आहेत मिस्तर किनवी दिलावरजंग बाहादूर हैदराबादेस आहेत त्यांजपाशी तुह्माकडोन पत्रे आली असल्यास तेथून आणविली येतील वरचेवर तिकडील वर्तमान लिहून पत्राची रवानगी करीत जावी तुह्माकडील पत्रे व अखबारा पेशजी पुण्याकडे रा नाना यांस पाठविल्या होत्या त्याचा जवाब तुमचे नावे आला तो हाली रवाना केला आहे पावल्याचे उत्तर पाठवावे चीनची जहाजें आली आहेत त्यापैकी आपल्याकडील यादीची जिनस तलाश करून घेतो ऐसे तुह्मी पेशजी लिहिले होते त्यास चीनचे जाहाजापैकींकोणता जिनस घेतला व कोणता घ्यावा याचा आमचे यादीप्रा व सिवाय चांगला जिनस आधी धाडल्या किमतीत कोणता कसा घेतला हे तपसीलवार ल्याहावें रा छ ९ सवाल बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद.