मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

राजश्री राजे रोषनराव यांचे                                                          लेखांक २१७.                                                      १७१५ वैशाख शुद्ध ८.
मागितल्यावरून पत्र रा छ ७ सवाल.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोपाळराव नाईक वानवले स्वामीचे सेवेसी -
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहीत जाणे विशेष तुह्मी पत्र पा तें पाऊन मार समजला मनुलाल यास भागा-नगरी पाठवावें परंतु रंगोबा नाईक यांचे पत्र आलें की आह्मी व मामानी श्रीमंत राजश्री बापूसाहेब यांस पत्रें लिहिली आहे. त्यास मनुलाल यास भागानगरास न पाठवावें याजकरितां शाहागडाहून पैठणास आणून ठेविलें सांप्रत आपलें पत्र आलें तेंहि पुण्यास पा आहे त्याचें उत्तर आलें ह्मणजे सेवेसी लिहीन ह्मणोन लिहिलें त्यास पेशजी राजश्री गोविंदराव व रंगोबा नाईक यांची पत्रें टप्यावरून आलीं होती त्याचीं उत्तरे त्यांस लिहिलीं आहेत कीं त्या मुलाच्याने तेथें फडच्या होणार नाहीं एथें त्याचा बाप आणिक राजे रोषनराव च्यार सोयरे आहेत याणी करारनामा लिहून दिल्हा आहे कीं मुलास आपणाजवळ आणून ठेवावें फडच्या करून देऊ मग मुलास आमचे हवालीं करावें त्याजवरून तुह्मांस च्यार वेळां पत्रें लिहिली त्याचीं उत्तरें तुह्मांकडोन एकहि दुरुस्त आलें नाहीं त्याजवरून अपूर्व वाटतें त्यास शंकरदास याजकडील कर्जाचा फडच्या जाला म्हणजे सर्वत्र फडचे जाले असे तुमचे मनांत येत असेल त्यास असें न करावे पुढें कामें फार आहेत त्याजवर दृष्ट द्यावी सांप्रत सरकारचा जासूद पा आहे याजबार मनुलाल यास एथें पाठऊन द्यावें अनमान न करावा एथें कळेल त्याप्रा फडच्या करून घेऊ मग त्यास निरोप देऊ इतकियावर तुमचे चित्तास न आले तर न यो लिहिण्याची पराकाष्टा जाली रा छ ७ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries