Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ४७
१६१६ आषाढ शुद्ध ७
श्री
अज दिवाण ठाणा तपे देवरूख ताl रयानी व ह्माडिगे मौजे उजरे खुर्द ताl + + सुll खमस तिसैन अलफ बदल देणे वृत वेदमूर्ति मादेभट बिन हरभट पुरोहित गोत्र कौसिक आस्वलायन सूत्र + + + स्थल मौजे मजकूर पैकी बाl सनद सुभा छ २० रमजान साल गुll तेथे आज्ञा की वेदमूर्ति भट गोसावियानि राजश्री छत्रपती स्वामी संनिध चजीचे मुकामी जाऊन आपणास वृत करून दिली पाहिजे ह्मणौनु विनति केली त्या वरून राजश्री स्वामीने मनास आणिता बहुत भले ब्राह्मण सिष्ट सत्पात्र देखोन यासि नूतन वृति करून दिली तपे मजकूर पैकी दाभोली लारी २०० दोनसे लारीची वृति करून दिली ऐसीयासी ब्राह्मण सिष्ट आहेत यासि पुत्र पोत्री चालिले पाहिजे या करिता यासि धर्मादाय पावत होता तो दूर करून सदरहू दोनसे पैकी हाली करार दाभोली लारी १०० एकसे लारीची वृती ,करार केली असे राजश्री अनाजीपताचे कारकीर्दीस जमिनीसि धारा व गलियासि निर्ख आहे त्या हिसेबी शभर लारीची पड जमीन चतु सीमा करून नेमून देणे ह्मणौनु राजश्री पडितराऊ याही लिहिले आहे त्या वरून सदरहू संभर लारीची वृती देविली असे सदरहू तहप्रमाणे पडजमीन मौजे उजरे खुर्द पैकी नेमून देणे सालमजकुरा पासून लागवड करून योगक्षेम चालवितील या प्रमाणे भट गोसावियासि पुत्रपौत्री पालीत जाणे सदरहू जमिनीच्या चतुसीमा करून सुभा लिहोन पाठवणे या प्रमाणे सनद सादर होईल ह्मणौनु आज्ञापत्र सादर होईल त्या वरून मौजे मजकूर पैकी पड जमीन स्थल गौलवाडा नेमून दिला असे चतुरसीमा
पूर्वेकडेस तलवडेचे परयापासून मारगा पावे तो सीमा मरग अरवली नजीक पाई व गोठण सीमा उतरे कडेस वेतालाची मली व ह्माराडी पासून तहद चोरपरया देवरूख सीमा पस्चमेस मारग व आखडका नजीक तहद सीमा परया तलवडी सीमा दक्षणेस चोरपरिया देवरुखची सीमा पासून तहद वेतालाची मली व ह्माराडी पावेतो सीमा
येकूण जमीन चावर पाच हाताचे काठीने ०l९ २ll पैकी वजा खडक झाड अजमासे ३lll१॥ बाकी जमीन ०l५l१ येकूण गला दसेरी ३ll०lll० एकूण एक बेरीज दाभोली लारी
एकूण गला दसेरी खडी तीन खडी पाउणे अकरा मण एकून लारी एकसे एकूण जमीन सवा पचतीस बीघे एक पाड थल गौलवाडा मौजे मजकूर पैकी हद सीमा करून मोजून दिली असे देखील झाड माड दिले असे पुत्रपौत्री चालवीत जाणे वेट बेगार व तडीतकसिमेचा उपसर्ग न लावणे प्रती लिहोन घेऊन असल भटगोसाविया जवल परतून देणे राl छ ५ जिलकाद