Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ४३
श्री


करीणा मौजे निवे बुll ताll देवरुख येथील पूर्वापार स्थीत गाव कोणाचा पूर्वी विज्यापुरीहून किले खीलणायासी नवद गाव तनखा देवले हातखबे हरचीरी देवरुख येथे चौकसी.. माहाली नेमून दिल्हा ते काली मामले प्रभावली माहाल मौजे मजकूर हा गाव वेढत असता टोळकृत होऊन आगरे नाबूद जाहाली सारे रयत गाव टाकून देशातरास गेले अकरा वर्षे गाव कुली वोसाड पडिला त्या वरी शके १५०३ व्रशासवत्सरी राजश्री सोमोवानाईक सरदेसाई मामले प्रभावली याणी विज्यापुराहून पातशाहा पासून मौजे-मजकूर इनाम व खोती मिरास करून आणिली आणि गावची लावणी केली गावीचे कदीम रयता परागधा होऊन गेले होते त्या मध्ये पाल्या व कुवलेकर कुणबी व गुरव व म्हार हे गावात आणिले व हातखबे विलायतीहून विठोबा मोघा उर्फ करबलकर त्यास गावात आणून सिध्धेस्वर वाडेयात आगर व सेत भूमी व गावची महाजनकी देऊन ठेविली व ढवला व अमृत्या व खडकार व इतर रयतां आणून वाडीमजकुरा पासून गावची माहामुरी केली व वाडे तीन वसविले मधील वटार व खालील वटारी आगर माडणी केली खा। घर गावात बाधले आगर माहामूर जाहालिया वरी तानो बलाल राजवाडकरी चिपुलणाब्राह्मण गावात आपलिया घरी जागा देऊन आवारीपणास ठेऊन त्याच्या हवाला खा। बाग व सेत केले व गणोवा सेवड्या याचे हवाली खाइल्या आगरी वरी दाहिजाचे आगर करून ठेवला त्या वरी चवीस वर्षे गाव इनामत व खोती नायक माlरनिले कडे चालिली त्या वरी इनामत दिवाणातून दूर जाहाली खोती मीरास नायक यास चालत असे त्याउपरी तानो बलाल राजवाडकर मजकुराचे अनुसधान करून विसोवा राजवाडकर गावात आला त्यास किनरा गोसावियाच्या जागा होता तो घरा बाधावयासी दिल्हा त्या पासून राजवाडकर गावात आहे तानो बलाल राजवाडकर मृत्य पावला त्याचे वसीचे देशातरास गेले त्याचे कोणी नाही याज प्रो। कितेक काल गेले याज वरी दोन वर्षे वलव्यामुले सेते बुडाली व आगरे बुडाली गावआगरी हि आगरे टाकून पलाले जुजवी वस्ती कोणी गावात राहिले त्याज उपरी विसा वर्षी सिवाजी माहाराज याचे राज्य जाहाले ढवलेयाचे आगरावरी रामाजी राजवाडकर करबलकराचे आगरावरी भानजी मधील वटारी हरबा याज प्रो। राहिले खोती देशमूखाचे निा॥ चालत आली सिवाजी माहा(रा)ज येऊन माlरनिलेस भेटोन गावची कमाविसी मागत होते नाईक कमाविसी न सागत मग बालाजी रघुनाथ सेणवी याणी भानजी विठल याचे अगत्य धरून गावची कमाविसी सागावी ह्मणौन बहुत प्रकारे सागीतले त्या वरून नाइकी भानजी विठल यासी कारभार सागीतला व आपण नायकी जाऊन रामभट हरडीकर याज कडील कुणबी घेऊन भानजीचे स्वाधीन केले त्या वरी भानजीने पाच वर्षे गावची कमाविसी चालविली गावचा कारभार न वोढे दिवाणची बाकी राहिली वसूल न पडे तेव्हा भिकाजी विस्वनाथ नायकी आपणा कडून कमाविसीस आपणा जवलून कमाविसीस आपणाकडून ठेविले त्या वरी हगामसीर बाकीचा व कर्ज येणे त्याचा तगादा लागला. तेव्हा कुणबी फिताऊन रयता घेऊन पलोन राजापूर प्राते गेला याचे राज्यात बटाई जाहाली खोतास गावा मध्ये उपजीविका नाही तेव्हा केशवनायक सरदेसाई होते त्याणी गावची खोती नारायणभट हरडीकर व भानजी राजवाडकर यासी चालवावयासी सागीतली ते चालवीत होते मग माहाराज सभाजी राजे याचे राज्यात नरसापा कानडा सुखवस्तू गावात दोन वर्ष राहिला मग त्याणे लबाडी कबजीबावाचे वगीने तीन वर्षे गावची खोती केली गाव न सोडी तेव्हां रगोवानायक सरदेसाई याणी सेवड्या व हरडीकर व राजवाडकर या तीघास गावीहून बोलाऊन आणून त्याज कदीम आगरी सेवड्या पुढे दिवाणात उभा करून वेव्हार सागोन पडतपावसी कानडा याची खोती दूर करून विठोबा सेवड्याचे स्वाधीन कारभार खोतीचे समधे केला त्यास गावचे उगवणीस मध्यस्थ नारभट हरडीकार व भानजी राजवाडकार घेतले त्याउपरी भालेराई जाहाली काही दिवस धामधुमीत चौघाचा रिगाव चालत होता त्या उपरी दोन तीन वर्षे गाव कुली वोसाड पडिला मग राजश्री रामचद्रपती रामाजी गुडेकार यासी चाकरी बदल गाव मुकासा करून दिल्हा तेव्हा राजवाडकर रामाजीचे अर्धल करून होते रामभट व शभुभट हरडीकर बाहेर होते गावात येऊन कुणबाबा देऊन होते पाच सात वर्षी रामाजीचा मुकासा दूर जाहला त्या वरी हरडीकरी व राजावाडकार खोती करू लागले मग राजश्री नीलप्रभु याचे कारकीर्दीस गणोवानायकी त्याची खोती दूर करून सभाजी अनत आबेकर खोतीचे मुतालकीस ठेविले तेव्हा गावी लुकसान आले मागती गणोवा नाइकी रामभट हरडीकर यासी खोती सागीतली त्याणी चौ दिवाणात जावयासी गाठ न पडे याकरिता विठोबा राजवाडकर यास वाटा दिल्हा त्या उपरी ती वर्षानी नारो गोरपाडा याची धामधूम होऊन मुलूक व गावचे लोक परागधा जाहाले तेव्हा विठोबा राजवाडकर बावडे प्रात वेगसरास गेला रामभट हरडीकर च्यार कुणबी होत ते हाती घेऊन देवरुख माहाली राहिले होते त्या उपरी दाहा अकरा वर्षी अतोवा नायकी रामभट हरडीकर यासी गावची लावणी करावयासी सागितली तेव्हा भानजी राजवाडकर वेगसराहून