Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ४९
१६२५ वैशाख वद्य ११

श्रीशकर 


  वेदमूर्ति राजमान्य राजश्री गोविंदभट रेमणे नामजाद व कारकून वर्तमान व भावी तपे देवरूख यासि परशराम त्र्यबक प्रतिनिधी नमस्कार सुहूर-सन सलास मया व अलफ माl तानकोवानाईक बिन कान्होवानाईक देसाई ताl मजकूर हुजूर येऊन विनंती केली की आपणास हक व इनामत चालत आहे तेणे करून अवकात चालत नाही आपण कटुबवछ(ल) आहे स्वामीच्या पायशी निष्ठेने वर्तणूक करीत आहो अशास स्वामीनी वरकड वतनदारास हक इनामती जाजती करून स्थापना केल्या आहेत तर श्वामीनी कृपाळू होउनु पेशजी चालत आहे त्या खेरीज जाजती इनामती करून देउन वतना वरी स्थापना होऊन योगक्षेम चाले यैसे केले पाहिजे ह्मणुनी त्यावरून मनास आणून तानकोवा-नाईक देसाई ताl मजकूर याणी एकनिष्ठपणे वर्तोन स्वामिसेवा केली खटपटे आणि कुटुंबवछल आहेत याचे चालवणे अगत्य या करीता कृपाळू होऊन पेशजी हक मोईन करून दिल्ही आहे ते व इनामत दोन बिघे चालत आहे त्या खेरीज हाली नूतन इनाम पडजमीन पैकी राजश्री अनाजीपताचे कारकीर्दीस जमिनीस धारा गलेयास नीर्ख असेल त्या प्रमाणे इनाम खेरीज दाभोली लारी १०० एके से रास इनाम देविले आहे तरी तुह्मी ताl मजकूर पैकी सदरहू बेरिजेची जमीन हकदार ईनामदार खेरीज करून कुलबाब कुलकानू देखील हालीपटी व पेस्तर पटी चालू प्रतीची पडजमीन नेमून देऊन चतु सीमा करून देऊन याचे दुमाले करणे त्याची कीर्द करून उपभोग करितील यासी व याचे पुत्रपौत्रादि वशपरपरेने इनाम चालवणे साल दर साल ताजे सनदेचा आक्षेप न करणे या पत्राची तालीक लेहून घेउनु मुख्य पत्र नाईक माlरनुले जवलि परतोन भोगवटियास देणे जाणिजे छ २४ जिल्हेज पाl हुजूर

बार     सुरु सूद      बार