Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ४०
१७१५ श्रावण वद्य ५

श्री 

स्वस्ति श्रीनृपशाळिवाहानशके १००८ क्षयनामसवछरे क्षत्रियकुलावत जयशेखराय राजा याणी श्रीधर व सहस्रशर्म ब्राह्मण यासी तोरगल समीप जोतिषाची वृत धारादत करून दिल्या नतर राजे शात जाहाले उपरात राज्यास अधिकारी नाही तेव्हा हत्तीच्या सोडेत माल देऊन नगरचे लोक जमा करून हत्ती फिरविला तेव्हा हातीने माल विद्यारण्य स्वामियाच्या गलात घातली त्यास हे सन्यासी याज करिता त्याचा सिश्य वीरबुक समीप होता त्याच्या गला ती माल स्वामीनी घालून त्यास राज्याभिषेक केला आणि त्या गावचे नाव विद्यानगर ठेविले स्वामीनी त्या राज्याचे प्रधानत्व करून सामराज्य केले त्यापासून त्या राज्याची वशावल

१ वीरबुक यास पुत्र नरसाणा नाईक
१ त्याचा पुत्र हरिहरराय
१ त्याचा पुत्र देवराय
१ त्याचा पुत्र नरसिगराय
१ त्याचा पुत्र वीर नरसिगराय
१ त्याचा पुत्र रामदेवराय
१ त्याचा पुत्र कृष्णराय
१ त्याचा पुत्र अचु तराय
१ त्याचा पुत्र सदासीवराय
१ त्याचा पुत्र रामराय
-----
१०

या प्रोl वीरबुक या पासून रामरायपर्यत अकरा पिढ्या त्याणी राज्य केले रामराय रक्षतगडी तालुके बागलकोट नजीक कृष्णातीर येथे आले होते ते समई अदलशाहा विज्यापूर व कुतुबशाहा हैदराबाद व निज्यामशाहा दौलताबाद या त्रिवर्गाही राजेयास मारून राज्य घेतले शके १३२२ श्लोक पराभवोब्दे माघे च शुक्ल पक्षे च पचमी शुक्रवारे च माध्यान्हे रामराज रणे हते ॥ पुढे राज्य यवनाचे जाहाले सदरहू हकीकत सिवाजी नरसिगराव गुमस्ते जेयगौडा लिगापा देसाई व सरदेसाई व नाडगौडा सरकार तोरगल पोl कोटनूर याज पासून लिहोन घेतली असे शके १७१५ प्रमादीनामसवछरे श्रावण वद्य ५ इदुवार मु॥ कसबे पुणे