Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ३३

हु
अजम सिदीसाद दाममह
बतहू

 मोहिबानीपन्हाही मखलिसान दस्तगाह अजी श्रीनिवासपडित प्रतिनिधी.. आकी येथील खुसी जाणऊन खुद खुसी कलमी मरकूम करीत जाणे दिगर माहाराज राजश्री स्वामीचे सरदेशमुखीचे वतन आहे त्यासि पातशाहानी नर्मदा आलाकडे सरदेशमुखचे वतन बाहाल केले आहे वरघाटे वतनी अमल चालत आहे कोकणप्राते सरदेशमुखीचा अमल जाला नाही त्यासि वतनी अमल चालवावया विसी अमलदारास हुकूम केला त्यासि माl विसोवानाइक सरदेसाई मामले प्रभावली व मामले दाभोल येही माहाराजाचे सेवेसी अर्ज केला जे दोनी मामलियाचे सरदेशमुखीचे वतन पुरातन आपले आहे त्या प्राl चालत आहे त्यासी स्वामीनी कृपालु होऊन वतनी अमल चालवावा ह्मणऊन अर्ज केला त्या वरून हे वतनदार पुरातन याचे सरदेशमुखीचे वतन चालवणे महाराजास जरूर या करिता दोनी मामलेयाचे वतन याचे यासी मोकरर करून दिल्हे असे हक लाजिमा इनाम पुरातन चालत आहे त्या प्रमाणे मोकरर केला असे आणि खासा वतनी अमल माहाराजाचा दोनी मामलेयाचा चालावा या स्तव सरसरदेशमुखीचे वतन मोकरर करून दर सदे पचोत्रा हक रयत निll मोकरर केला असे त्या प्राl चालेल ये विसी कोणी खेलेल करील त्यासी ताकीद केली पाहिजे दराज काय लिहिणे