Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक ३२
श्री १६५२

राजश्री सेखोजी आगरे सरखैल
गोसावियासि

 सकलगुणालकरण अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य श्री श्रीनिवास परशराम प्रतिनिधी आसीर्वाद विनती उपरी येथील कुशल जाणऊन स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे विशेष राजश्री प्रहरादनाईक सरदेसाई मामले प्रभावली व दाभोल हे हुजूर राजश्री स्वामीसनिध सेवा करितात व राजश्री दादोवानायक सरदेसाई मामले मजकूर हे हि हुजूर येऊन हाजीर जाले ऐसियसि याच्या हक लवाजिमा व इनामतीस गोसाविया कडून खलेल जाहाली आहे ह्मणऊन विदित जाले तरी हे हुजूर या राज्यात दखल नसते तरी याच्या वतनास खलेल करावी हे उचित च होते परतु हे दखल होऊन स्वामी सनिध सेवा करितात ऐसे असता याच्या वतनास खलेल करावी ऐसे नाही हे पुरातन वतनदार हे आपल्यास हि अवगत च आहे याचे हरएक विसी अगत्य धरून चालवावे हे विहित आहे या उपरी गोसावियानी आपल्या कडील कमावीसदारास ताकीद करून मामले मजकूरचे हक व लवाजिमा व इनामती सुरलीत पेसजी पासून भोगवटा आहे त्या प्रमाणे यास प्रविष्ट हो तो + + + ... ... .. . ... जाणिजे छ १० जिल्हेज बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा