Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २८
श्री १६४६ चैत्र वद्य ८

स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ५० क्रोधीनामसंवछरे चैत्रबहुलअष्टमी भानुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शभुछत्रपती स्वामी याणी राजश्री गणोवानाईक व विसोवानाईक व दादोवानाईक व अतोवानाईक गोत्र कौशीक सरदेसाई मामले प्रभानवली व मामले दाभोल यासि दिली वतनपत्र ऐसे जे तुह्मी पूर्वी स्वामीसनिध आपल्या वतना विशई विनति केली होती व हाली तुमचे पुत्र प्रल्हादनाईक व केशवनाईक व शामजीनाईक बिन गणोवानाईक याणी किले पनालाचे मुकामी विनती केली की मामलेमजकूरचे सरदेशमुखीचे वतन महत्कदीम आपले मामले प्रभानवली खाले ताl मलकापूर व ताll असडोली हे दोनी माहाल वरघाटे आहेत येथील कदीम सरदेशमुखी इदलशाहाचे कारकीर्दीस आपले वतन चालत होते त्या आलाकडे कितेक दिवस मुकाशा मुले दो माहालचा भोगवटा आपला राहात आला आहे तरी स्वामीनी मेहरवान होऊन वा वतनाचा भोगवटा बहुत दिवस राहिला आहे तो जीर्णाधार करावयासि माहाराज समर्थ आहेत ह्मणऊन विस्तारे विनती केली त्यावरून मनास आणिता मामले प्रभानवली खाले सदरहू दोनी माहाल कदीम चालत होते अदलशाही मुकाशा मुले व या राज्यात वरघाटे तीर्थरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामीनी नूतन सुभे केले तेव्हा तरफ मलकापुरा खाले आणिखी च्यार माहाल देऊन स्वतत्र सुभा केला व ताl तारलेयाचा सुभा स्वतत्र केला त्या खाले आणिखी माहाल व ताl असडोली हा माहाल दिल्हा त्या मुले वतनाचा भोगवटा राहिला ऐसे दिसोन आले परतु कदीम वतन इदलशाई कारकीर्दीस प्रभावनली खाले हे दोनी माहाल चालत होते दरम्याने भोगवटा राहिला नाही ह्मणऊन वतनदाराचे वतन उठावे ऐसे नाही तुह्मी वतनदार प्रामाणीक स्वामीच्या पायासी तीर्थस्वरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामी पासून हा कालपर्यत एकरूप निष्टेने वर्तत आहा तुमचे चालवणे हे स्वामीस परम अवश्यक या स्तव स्वामी तुह्मावर कृपाळु होऊन ताl मलकापूर व ताl असडोली या दोनी माहालचे सरदेशमुखीचे वतन कदीमप्रमाणे तुह्मास अजराम-हामत करून दिल्हे असे तर तुह्मी सदरहू दोही माहालचे वतन आपले दुमाला करून घेणे या वतनास हक व लवाजिमा व जकायतीस विस्वा वर निसबत मामले प्रभानवलीचे बाजे माहाल प्रमाणे घेत जाणे या वतनसमधे तुमचे माथां शेरणी रुपये ६००
                            ताl मलकापूर ३००            तl असडोली ३००

एll साहा से रुपये रास करार केले असेत याचा वसूल हुजूर होईल सदरहू वतनाच्या सनदा अलाहिदा माहालचे नावे सादर आहेत तुह्मी सदरहू दोही माहालचे सरदेशमुखीचे वतन तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वशपरपरेने अनभवणे आणि वतनाची सेवा करून सुखरूप राहाणे जाणिजे सदरहू शेरणीचा ऐवज हुजूर पावऊन पावलियाचा जाब घेणे तेणे प्राl मजुरा होईल जाणिजे