Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २६ नकल
१६४२ आश्विन वद्य १२

 हु

अज सुभा मुकाम किले अजणवेल मामले मैमून
मुस्तफाबाद उर्फ दाभोल + + ले मुजाफराबाद

उर्फ प्रभावली देशमुखानी व मुकादमानी व देशपाडे यानी व बाजे वतनदारानी व खोतानी व रयानी माहालनिहाय सुभा दाभोल सुहुर सन इहिदे अशरीन मया व अलफ दादोवानायक बिन रगोवानायक सरदेसाई सुबैन मजकूर याही सुभा मुकाम मजरी इलतमास केली की आपले सरदेशमुखीचे वतन कदीम पुस्त दर पुस्त सुबैन मजकूरचे चालत आले असे दरम्याने धामधुमीचे सबबे करिता सरकारतर्फेस रुजुवातीस मवाफीक आले नव्हते सबब केसो कृष्ण गुमस्ते मामले दाभोल यासि सन खमस अशरमध्ये वतनी पादशाई फरामीन गुमस्ते मामले दाभोल यासि सन खमस अशरमध्ये वतनी पादशाई फरामीन व बाजे कागद देऊन हुजूर जजिरे दडाराजपुरीस रवाना केले होते ते वख्ती त्याणी हुजूर जजिरा जाऊन वतनी कागद दखल केले त्या वरून हुजुरून खातरीस आणून मेहरवान होऊन केसो कृष्ण मुतालीक यासि वतन चालवावयासि खुर्दखत मराहमत केलें असे त्या वर ते सुबैन मजकुरी वतनाचे चाकरी वर होते त्या वर आपण हि साल गुदस्ता हुजूर जजिरे दडाराजपुरीस जाऊन रुजू होऊन अर्ज केला की वतनाची खिजमती चालवावयासि हाली उमेदवार असो तरी आपले व आपले भाई याचे नावे खुर्दखत देणार साहेब धणी आहेत म्हणोन अर्ज केला त्या वरून हुजरून मेहरवान होऊन सन अशरीनमध्ये मरामत केले असे त्या मध्ये कदीम हक लवाजिमा इनामत व इसाफत सुदामत चालिले असेल ते बमोजीब सुभाहून ताकीद फर्माऊन देविली पाहिजे ह्मणोन इलतमास केला ऐसियास सरदेसाई मशारुनइले या वर मेहरवान होऊन हुजुरून खुर्दखत छ २९ जमादिलाखर सन अशरीन मरहमत केले असे तथे हुकूम जे सरदेशाई मजकूर हुजूर येऊन खुर्दखतबाबे अर्ज केला त्या वरून खातरेस आणिता सन सीत अशरमध्ये सरदेसाई माlर याचे नायब केसो कृष्ण हुजूर येऊन रुजू होऊन वतनाचे खुर्दखता बाबे अर्ज केला त्या वरून छ ११ जिल्हेजी मेहरवान होऊन खुर्दखत करून दिल्हे असे की सुबे मजकूरचे सरदेशमुखीचे वतनाची मुतालकी याची कदीम असे सबब याचे दुमाला केली असे याचे हातून वतनाची खिजमत सुदामदमोजीब पिढी दर पिढी घेत जाणे ऐसे सादर असे हाली खुद दादोवानायक सरदेशाई सन मजकुरी हुजूर येऊन रुजू जाहाले आणि वतनाचे खुर्दखताबाबे अर्ज केला त्या वरून हुजरून या वर मेहेरवान होऊन खुर्दखत मराहत  केलें असे सुबे मजकूरची सरदेशमुखी याची कदीम असे सबब वतन चालवावया फरमाविले असे तरी खुद नायक मशारइले व याचे बडेभाई गणोवानायक वलद रगोवानायक व त्याचा बेटा प्रल्हादनायक व दुसरे भाई विसोवा नायक व नने भाई अतोबानायक याचे हातून वतनाची खिजमत पिढी दर पिढी सुदामतमोजीब घेत जाणे व याचे वतनाचा हक लवाजिमा व इनामत व इसाफत सुदामत चालिली असेल ते मोजीब चालवणे दर साल ताजे सनदेचा उजूर न धरणे नकल घेऊन असल फिराऊन देणे ह्मणऊन हुजूरचे खुर्दखतात हुकूम सादर असे ऐसियास खातरेस आणिता सुदामत सरदेशाई मशारइलेयाचा कदीम हक लवाजिमा चालिला आहे त्या मोजीब हाली हि देवावा दुरुस च असे अमा अवल मुलकाची आबादी होती तेव्हा मवाफीक च पडत होते फीलहाल चहूकडील कसालेया मुले मुलूक वैरान असे जुजवी वसाहत असे ते रयत कसालेया मुले नाबर पडिली असे मामुले सुदामतमोजीब हक लवाजिमा घ्यावयासी मवाफीक पडणार नाही या बदल सरदेशाई मशरुनइलेयासी फर्माविले की पेस्तर मुलकाची उस्तवारी जाहालेया वर तुमचा हक लवाजिमा सुदामत चालिला असेल त्या मोजीब घेणे व रयत हि देईल फीलहाल रयतेचे नादानी करिता करार करून फरमाविले असे तरी येणे प्रमाणे हक लवाजिमा देत जाणे बिll

येथे लवाजीमा 

येणेप्रमाणे हक लवाजिमा फीलहाल करार करून दिल्हे आहे तरी सदरहू मोजीब सरदेशाई मशारुनइलेयास देत जाणे पेस्तर मुलकाची आबादी जाहालेया वर सुदामद कदीम हक लवाजिमा चालिला असेल त्या प्रमाणे घेत जातील व तुझी हि सुदामद मोजीब देत जाणे दर साल ताजे सनदेचा उजूर न करणे नकल घेऊन असल सरदेसाई मशारइले या नजीक देणे ताकीद समजणे छ २५ जिल्हेज सन २ जुलूस१ (१ हा जुलूस 'महमदशाहाचा' आहे, हा शहाअलमचा नातू. यास च बाळाजी विश्वनाथाच्या मदतीने सय्यदानी दिल्लीच्या तक्तावर बसविला) मुताबिक सन ११३३ हिजरी