Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २७७
१७०८-१७०९

श्री
करीण्यातील कलमे भिमाजी गोसावी याची पुरसीस केली
१ महादेव गोसावी यानी क्षेत्रकराड येथे भिमाजी गोसावी यास पुत्र करून माडी वर घेतला हे पत्रानिशी व साक्षीनिशी पुरऊन देऊ हे लि।। खरे दत्तविधान करून घेतला इतकी पुरवणी करून देऊ न देऊ तर वादास खोटे
याचे उत्तर
१ पत्रानिशी व भुक्तिनिसी पुरवणी जाहली नाही मग साक्षीनिसी पुरवणी करून देऊ ह्मणोन लि।। ते साक्षीदार कोण आहेत ते सागणे त्याज वरून साक्षीदार नावनिशीवार
१ गोपाल जोसी                  १ माणिकभट पढरपुरे
१ रघुनाथभट गिजरे            १ विटलभट पढरपुरे
१ भाऊ देशपाडे                १ बाबूराव जगनाथ
---                                ---
                                     ३
जबान्या साक्षीदाराच्या
जबानी गोपाल जोसी भिमाजी गोसावी याची मुज माहादेव गोसावी याच्या माडी वर केली या उपरातिक आह्मास काही ठावके नाही
कलम १

जबानी माणिक दीक्षित पढरपुरे भिमाजी गोसावी याची मुज्य कोणाचे माडी वर केली ठाऊक नाही त्या समई सईबाईने विचारले की या मुलास ब्रह्मचारी करिता किंवा ग्रहस्ताश्रमी करिता त्यास महादेव बावा बोलिला की ब्रह्मचारियास पुत्र कशास पाहिजे त्यास तो ग्रहस्ताश्रमी होईल या पेक्षा आह्मास काही ठाऊक नाही कलम १

जबानी रघुनाथभट गिजरे यास विचारिले त्यानी माणिकभट पढरपुरे याणी सागितल्या प्रमाणे त्यानी हि जबानी सागितले येणे प्रो। कलम १
जबानी भाऊ देशपाडे यानी उभयतानी सागितल्या प्रमाणे देशपाडे यानी संगितले ज्याजती काही टाऊक नाही कलम १