Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २११
१६२९ ते १६४८

श्री

वेदमूर्ति राजश्री समस्त ब्राह्मण क्षेत्रकराड स्वामीचे सेवेसी विद्यार्थी कृष्णाजी विठल साष्टाग नमस्कार विनति उपरि मौजे सैदापूर पा। कराड हा गाऊ राजश्री छत्रपति स्वामीनी इनाम दुतर्फा जलतरुपाषाणनिधिनिक्षेप कुलबाब कुलकानू दिल्हा आहे एैसीयास सालमजकुरी पर्जन्याचे अवर्शण पडिले या स्तव राजश्री पतप्रतिनिधिस्वामीनी पर्जन्यसूक्ताचे अनुष्ठान करवणे ह्यणून आज्ञा केली त्याज वरून समस्त ब्राह्मणास विनति केली की पर्ज्यन्यसूक्तअनुष्टान करावे ती समधे तुह्मी मौजेमजकुरास वेठी बेगारी राहदारीचा उपद्रव लागतो तो निवारण करावा ह्मणून आज्ञा केली ते कबूल केली स्वामीनी अनुष्टान आरभ केला श्री चे दयेने पर्जन्य बहुत समाधान जाले मौजे मजकुरास वेठी बेगारी राहदारी कुल मना केली असे कोणी उपद्रव करणार नाहीत राहदारीचे वोझे अगर वेठीबेगारी येकदर मना केली असे कोणास राहदारीमाणूस व वेठीबेगारी न देणे जे येतील ते पुढील गावी जातील तुह्मास उपद्रव नाही छ २४ रमजान सु। इसन्ने अशरीन मया व अलफ
लेख नावधि