Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक २१३
१६३८ ते ४० बाळबोध

श्री आई
वेदशास्त्रसपन्न राजश्री नारायणभट्टजी गिजरे वास्तव्य कराड गोसावियासि

विद्यार्थी कृष्णाजी परशुराम प्रतिनिधि साष्टाग नमस्कार विज्ञप्ती उपेरी येथील कुशल जाणऊन स्वकीय लेखन करणे विशेष वेदमूर्ति हरीपाठक येळगावकर हे ब्राह्मण पुरातन अमचे आश्रीत आहेत यैसे तुह्मास ठावके च आहे आजि पन्नास वर्षे कराडी राहात आहेत याचा योगक्षेम चालावयास आह्मी व चिरजीव रायानी यास येणपे दिले आजी परियत राजश्री कृष्णाजीपती ही चालविले परतु आता त्यानी खेडे वरी हरयेक गोष्टीचा अतिशय करितात ह्मणून वेदमूर्ति कुटुब घेऊन आह्मा कडे येतात तरि तुह्मी या वर पूर्ण दया करीत असता यानी यावेसे काय आहे तुमची कृष्णाजीपताची मैत्री आहे त्यास पष्ट च्यार गोष्टी सागून वेदमूर्तीस क्षेत्र न सुटे ते गोष्टी केले पाहिजे तुह्मी अनुमान कराल तरी तुह्मास अमची आण असे विशेष तीर्थरूपाचा पक्ष त्रयोदशीस आहे आपण आलियाने आह्मास परम सतोष होईल बहुत काय लिहिणे लोभ असो देणे येक वेळ भेटीस येणे हे विज्ञापना