Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १९१
१७६३ फाल्गुनमास बाळबोध
श्रीक्षेत्रपाल प्रसन्
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री रघुनाथदिक्षीत् गिज्रे व नागेशदिक्षीत्काका व गोविंददिक्षीत गरुड व अण्णादिक्षीत् उब्राणि बाबाटिक्षीत गिज्रे याशि प्रति नृसिहदिक्षीत ग्रामउपाध्ये वास्तव्य मठ सकेश्वर शिरसाष्टाग नमस्कार विनती विज्ञापना येथील क्षेम तागायीत् फाल्गूण वद्य १२ पर्यत अपले अशिर्वादे करून सर्व मडळी सुत्धा सुखरूप असे विशेष तीर्थहळीकर स्वामी येक अपण सस्थानी ह्मणून पुण्यास अले होते हे वर्तमान यथे श्री समजले नतर त्यास कोणि पूजा करू नये व पूजाद्रव्याचि पटी देवू नये अशी अज्ञापत्रे पाठविल्या वरून पुण्यात सभा होवून ज्या प्राति उत्तरदेशात् करवीरमठचा अधिकार इतर स्वामीनी सचारास फिर्ण्याचा अधिकार नाहि असा पूर्वी च निबध आहे त्या प्रमाण असावे असे ठरून तीर्थहळीकर यास पूजा न करिता शहरातून घालवून दिले ते प्रस्तुत वायी साता-यास अले आहेत् याजकरिता यिकडून सर्व क्षेत्रास पत्र रवाना झाली आहेत ते क्षेत्रास येतील याज करिता श्रीनि अपल्या समस्ताचा नावे अज्ञापत्र पाठविले आहे त्या प्रमाणे बदोबस्त जाहला पाहिजे येविषयि अपल्यास लिहिणे विषयी श्रीचे अज्ञा झालि ह्मणून लिहिले अहे बहुत् काय लिहिणे हे विज्ञापना