Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १८६
१७५० मार्गशीर्ष वद्य ७
श्री
नकल
सिका
श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्याद्यनेकबिरुदाकितश्रृगेरीश्री-
मदभिनवोद्यडगगाधरभारतीस्वामिभि
प्रिय सिष्य समस्त ब्राह्मण उभयक्षेत्रमाहुली यासि आसिर्वादपूर्वक कृतनारायणस्मरणानि विशेषस्तु आज्ञा केली ऐसी जे ब्राह्मणाचे शुधपत्र कासीपत बेदरे या जवळ दिल्हे नाना दीक्षीत मठास शरण येऊन शुद्ध जाहल्या वर कारकुना बरोबर पत्र जावे ते न होता तुह्मी च पत्र घेऊन गावगन्ना फिरोन उधता करिता मठाचे पूजाद्रव्य घेता बड फिरविता असे श्रुत जाहले हे अब्राह्मण्यता याचे करणे नाही. नानादीक्षित शुध नाही त्याचा ससर्ग तुह्मी केल्याने तुह्मास । पूर्ववत् होईल हे समजोन द्विजतेस योग्य ते करणे गावगन्ना ब्राह्मणास उपसर्ग, दिल्ह्याने नीट नाही मठाचा कारकून बरोबर नसता गावगन्नाच्या ब्राह्मणा पासून पूजाद्रव्य घेतले ह्यणून समजले ऐशास ते पूजाद्रव्य मठास पावत नाही नानादीक्षित मठास शरण येऊन शुधता पावल्या सिवाय गावगन्ना पत्रे जाऊ नये मिती मार्गशीर्षवद्य ७ शके १७५० सर्वधारीनामसवत्सरे विशेष लिहिणे ते काय इति नारायणस्मरणानि