Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)

लेखाक १९०
१७६३ फाल्गुनमास

श्रीशंकर

श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यवर्यपदवाक्यप्रमाणपारावारपा-
रीणयमनियमासनप्राणायामप्रत्याहारध्यानधारणसमाध्यष्टा-
गयोगनुप्ठाननिप्ठतपश्चक्रवर्त्यनाद्यविछिन्नगुरुपरपराप्राप्तष-
ट्ददर्शनसस्थापनाचार्यव्याख्यानसिहासनाधीश्वरसकलनिग
मसाहृदयसाख्यत्रयप्रतिपालकवैदिकमार्गप्रवर्तकसर्वतत्र
स्वतत्रश्रीमहाराजधानीश्रीमद्राजाधिराजगुरुभूमडलाचार्य
ऋष्यश्रृगपुरगधीशपचगगातीरवासकमलानिकेतनकरवी
रसिहासनाधीश्वरश्रीमच्छकरभगवत्पादजान्हवीजनितश्रीविद्या
नरसिहपादपद्माराधकश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतश्रीभा
क्सपरिवाराणामनुदिनमेधमानभव्यप्रदनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजेश्री ब्रह्मवृद व राजकीय गृहस्थ वा। क्षेत्र श्रीकरहाटक परमशिष्योत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इछित छात्रसभासमवेत श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखनी मानस सतोषवीत असले पाहिजे तदनतर तीर्थहळीकर स्वामी हे श्रीगेरीकराचे नाव सागून सस्थानच्या साप्रदाया प्रमाणे चिन्ह करून त्या प्राती साचारार्थ आला त्याणी पुणे येथे येऊन जिनगरज्ञाती कडे पट्टी मागू लागला हे वर्तमान मठसस्थानी श्रुत जाहले वरून इकडोन समस्त ब्रह्मवृदाचे नावे पत्र देऊन वेदमुर्ती राजश्री व्यकट दीक्षित अथणीकर याची रवानगी जाहली त्या वरून समस्त ब्रह्मवृदाची सभा होऊन मलापहारी पासोन उत्तर प्राती आचारवेव्हारप्रायश्चित्तादिक करणे पूजाद्रव्याची पट्टी सर्व ज्ञाती वर करणेचा अधिकार करवीरस्वामीचा इतर स्वामीस अधिकार नाही हे समजोन त्या प्राती त्यानी फिरू नये अशी ताकीद होऊन पुणेशहरातून घालविले तो हाली सातारेइलाखेत श्रीक्षेत्र वैराज वगैरे ठिकाणी आला आहे ह्मणोन विज्ञात जाले त्यास तीर्थहळीकर यासी तुह्मी कोणी पादपूजा व पट्टी वगैरे न करिता जाणे विसी साफ सागावे इत पर कोणी त्यासि मिलाफी जाहले असता तुमचे विनतिपत्र पा । द्यावे ह्मणजे निग्रहपत्र रवाना करणेची आज्ञा होईल विशेष लिहिणे ते काय शके १७६३ प्लवगनामसवत्सरे फाल्गुणमास महानुशासन वरीवर्ति