Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक १८४
१७३१
श्रीशंकर
श्रीमत्परमहसादियथोक्तबिरुदाकितसर्वतत्रस्वतत्रश्रीगीरी-
सिव्हासनाधीश्वरपचगगातीरकरवीरक्षेत्रनिवासश्रीमत्श-
कराचार्यान्वयसहज्याताभिनवश्रीविद्यानरसिहभारतीस्वामि-
करकजोद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद व राजकीय ग्रहस्त व मोकदमानि देहदाय गावगनानि अहद क्षेत्र करवीर तहद श्रीक्षेत्रकासी यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित श्रीनिकट असो तदनतर कर्नाटकप्रातातून दडधारी यती हे काशीयात्रेस जातात व काशीयात्रेस जावयाचे उद्देशे करवीरमठास येवून विनती केली जे आपणास मार्गी भिक्षा व संरक्षण व्हावयाचे दुर्घट त्याज वरून हे आज्ञापत्र तुह्मास दिल्हे असे तरी हे माध्यानकाली जेथे राहातील तेथे यासी भिक्षा व रात्रौ याचे सरक्षण करून पुढे मार्गस्थ करून द्यावे विशेष लिहिणे ते काय शके १७३१ शुक्लनामसवत्सरे माहानुशासन वरीवर्ति मोर्तब