Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८१
१७३० चैत्र शुद्ध ९
श्रीशकर प्रसन्न
यादी ग्रामस्त मडळी मसुरास श्रीमत राजश्री बापू गोखले याज कडेस गेली श्रीजगद्गुरुमठ हपीविरूपाक्ष श्रीशृगेरी यास भिक्षा करून पूजाद्रव्य दिले त्यास आह्मी देत नाही ह्यणून फिर्याद शके १७३० चैत्र शु।।स गेले बि॥
१ अबाचार्य घलसासी १ रामाचार्य घलसासी
१ माणिक दीक्षित उबराणी १ बाजी दीक्षित उब्राणी
१ भाऊ दीक्षित गिजरे १ माणिक दीक्षित गिजरे
१ नागेशभट अणा ढवलीकर १ आबाभट पढरपुरे
१ बालभट दुबापे १ अणा दीक्षित खीरसागर
१ गणेश दीक्षित गिजरे १ रामचद्र भट ग्रामोपाध्ये
१ हरभट सागवडे ----
--- ६
७
--
१३
एकूण तेरा असामी जाऊन कराड सुभा राजश्री व्यकटराव मराठे यास पत्र आणिले तात्या गिजरे याजकडे प्रायश्चित्ताचे रुपये येणे ते देत नाहीत तर त्याजकडे भटजीनी रुपये रुजू करून बाकी स्वामीचा पटीचा ऐवज भटजी देतील ह्मणोन पत्र मिति मा।र