Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकवीसावा (शिवकालीन घराणी)
लेखाक ११८
१६४८ वैशाखशुद्ध १ गुरुवार
श्री
स्वस्तिश्री राज्याभीषेकशक शके ५२ पराभवनाम सवत्सरे वैशाखशुध प्रतीपदा गुरुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी याणी मोकादमानी मौजे टाळगाव प्रा। क-हाड यास आज्ञा केली ऐसी जे वेदमूर्ती रा। नारायणभट बिन वीरेश्वरभट उपनाम गिजरे गोत्र देवरात सूत्र आश्वलायन अग्निहोत्री वास्तव्य क्षेत्र कसबा क-हाड हे थोर ब्राह्मण वेदशास्त्रसपन्न सत्पात्र क्षेत्री वास करून स्नानसध्यादि षट्कर्मे आचरोन स्वामीस व स्वामीच्या राज्यास अभीष्ट चितून आहेत याचा याचा योगक्षेम चालविलेयाने श्रेयस्कर आहे ऐसे जाणोन स्वामी याजवर कृपाळू होऊन मौजे मजकूर पेशजीच्या मुकाशियाकडून दूर करून हाली वेदमूर्तीस नूतन ईनाम स्वराज्य मोगलाई अमल येकूण दुतर्फा देखील हालीपटी व पेस्तरपटी व ईनाम तिजाई कुलबाब कुलकानू खेरीज ईनामदार व हकदार पुत्रपौत्रादिवशपरपरेने ईनाम करून दिल्हा असे तरी तुह्मी यास रुजू होऊन मौजेमजकूरचा ऐवज आकार प्रमाणे भटगोसावियास व याचे वशपरपरेने याजकडे वसूल देत जाणे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहून घेऊन हे पत्र भोगवाटियास. भटगोसावी याजवली
परतोन देणे लेखनालकार
रुजु सुरु सुमत सा॥ सा॥
निविस सुमत मत्री सरकार
तेरीख २९
साबान सु।। सीत अलफ
बार सुद सुरु सुरु
बार बार बार बार