Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
त्यास पूर्वी आमचे वडिली विसाजी परशराम याणी अठरा होन दिल्हे होते ते त्याचे आगी लाविले व त्रिबक विश्वनाथ याणी सौम्य सवत्सरी सोनवरीचे दिव्य जालियावरी दुसरे वर्षी मौजे भोळीस येऊन परभुणियाच्या दिव्याबदल खर्चाचा हिसेब करून होन सत्तावन ठराविले त्यास त्रिबकपती रगावा पानसी त्याच्या घरातील भाऊ याबराबरी घोडा विकावयासी रत्नागिरीस यात्रेस पाठविले त्याबा। होन सवासे त्याकडे होते व इनामाचे खत सोडविले होते त्यास त्रिबकपती या पैकियाचे व्याज व मुदत हिसेब केला त्याणी सत्तावन होनाचा व्याज मुदल हिसेब केला ऐसा कज्या वाढला मग पाचा गावातील निमेचा भाऊ काकाजी राम व भोळीचे पाटील व बारा बलुते श्रीसिध्देश्वराचे देउळी निरेचे काठी बसून कज्या निवडिला मग त्रिबक विश्वनाथ यासी अवघियाणी पदर पसरून घोडियाचा पेका सवासे होन होते ते खर्चाबदल सत्तावन होनाचे ऐवजी देविले व इनामबा। खत मोघम त्रिबकपताचे ठेविले आणि पाढरीचे साक्षीने पत्र करून घेतले पाचा गावामद्ये एक वाटा वडील घर साबाजीपत व मल्हार राम याचा व एक वाटा त्रिबक विश्वनाथ याचा व एक वाटा तिसरा कुमाजी बापुजी याचा एकून निमेमध्ये तिघे भाऊ वशभाऊ अनुक्रमपरनाळकेने खावे ह्मणून पत्र दिल्हे ते पत्र बजिनस आह्मी गोतादेखता माहादाजी चितामण व खडो नागनाथ यास दाखविले त्याची साक्ष गोतमुखे पुरली मग गोतन्याये दिव्याचा खर्च उडाला मग महादजी चितामण बोलिला की या पत्रास बहुत दिवस जाले त्यावरी तुमचा भोगवटा नाही राजकामुळे आह्मास नागवणा व पडी पडिलिया मिरासपटिया व इनामतिजाई पडिली तो हिसेब करून वारणे आणि आपली साबी तक्षीम खाणे मग गोतानी हिसेब मनास आणून आह्माकडून त्याचे पडीचा पैका देविला तो मारफात गणेस गगाधर कुलकर्णी मौजे चादक आह्मी माहादाजी चितामण याचे पदरी घातला काही राहिला होता तो सवे च खडो नागनाथ याची आई पार्वतीबाई काशीस गेली तो त्याजवळ दिल्हा आणि आपली तक्षीम खरी करून घेतली त्याचे पत्र जिवाजी साबाजी व माहादाजी चितामण व खडो नागनाथ याचे करोन घेतले व जिल्हेकडील पत्रे करून घेतली त्यासी खर्च सातारा बसला व भावास हि गावी जाऊन बहुमान केला आणि पत्रे श्रीरवळनाथाचे देउळी त्याजवळून घेतली देह बि॥
पा। सिरवळ ता। नीरथडी पुणे
१ मौजे भोळी १ मौजे तोडील
१ मौजे तोडील १ मौजे लोणी
१ मौजे गुणप ----
--- २
३
एकूण पांच गांवी सहावी तक्षीम करार वंशमालिकेने खरी करून घेतली त्यावरी खंडो सिवदेव व लक्ष्मण माणकेश्वर श्रीमंत राजश्री बाजीराऊ पडित प्रधान यासि मौजे खडेराजोरी प्रात मिरज या मुकामी भेटून सागितले की आपला व निंबाजी बाबाजीचा सोनोरीच्या वतनाचा कज्या निवडला नाही तर निंबाजीपतास हुजुर आणून त्यास व आह्मास गोत देऊन बरहक्क मनसुबी करविली पाहिजे त्यावरून तुह्मास राजश्री पतप्रधान याणी पत्र पाठऊन लष्करास बोलाऊन आणिले तुह्मास व आह्मास गोत राजश्री मल्हार तुकदेऊ पुरधरे व राजश्री माहादाजी आबाजी पुरधरे देशपांडिये कर्यात सासवड हे नेमून दिल्हे हरदो जण या गोतास रजावद जालो सासवडीहून सोनोरीसनिध आमचे वशपरपरेस सासवडकर वाकीक आणि दियाचे देशपाडे आमचे मायथळ आहेत दिवाणीने हे गोत नेमून दिल्हे त्यास आह्मी उभयता मान्य असो ऐसे बोलोन तुह्मी व आह्मी सासवडकर पुरधरे देशपाडिये याजवळ आलो तुमचा आमचा करीना त्या उभयतानी मनास आणून ते उभयता बधू बोलिले की तुह्मी गोतमुखे निवाडियास राजी आहा की भाऊपणियाने घरी समजता हे गोष्टीचा विचार करून सागणे गोतात निवाडियास रजावद असाल तरी तैसे च सागणे घरी समजणे असेल तरी आपला विचार दृढ करून समजणे मग तुह्मी आह्मी ऐसे घरास आलो परस्परे भाऊ- पणियाने आपल्या आपणात सवाद केला त्यास तुमच्या व तुमच्या पुत्राचे मते व आह्मास खडो शिवदेव व लक्ष्मण माणकेश्वर व गोविंद गोपाल याचे विचारे समजाविशीचा प्रसग निघाला तुह्मी बोलिलेत की मौजे सोनवरीचें कुलकर्ण व जोतीश आपले वडिली आपली निमे तक्षीम तुमच्या वडिलास खर्चाबाबल लेहून दिल्ही आहे ते खरी त्यामधून तुह्मी आह्मास निमे जोतीश आमचे तत्रिमेचे मोकळे करून देणे व कुळकर्ण निमे आमचे तक्षिमेबाबत आहे ते तुह्मी सोनीरीच्या खर्चाबद्दल तुह्मी घेणे ऐसे बोलिलेस त्यावरी आह्मी त्रिवर्गांनी तुह्मासी उत्तर केले की, आमच्या वडिलास तुमच्या वडिली आत्मखुशीने आपली तक्षीम खर्चाबाबत लेहून दिल्ही आहे