Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २७७ श्रीकेदारलिंग १३३० आश्विन शुध्द ५
बगाड नि. नांगर
तालीक
शके १३३० आस्विन शुध्द पंचमी आंबाजी पाटील कसबे सातवे समस्तदेव मिळोन री रत्नागिरीस गेले तेथे वतन करून दिल्हे बगाडाचे हक हकदारी करोन दिली देसाई व देशपांडे व समस्त विद्यमानपत्र करोन दिल्हे त्याचा हक बगाडाचा दिवाणाचे रू॥ ३ तीन आंबाजी पाटलाचा हक रु.० ॥. निमे व बकरेची मुडी व खोबरेची वाटी एक १ व पैसा १ एक व कुटाफळी पैसा एक व दुकानास पैसा एक बगाड आवघी जाहले उपरी दिवाणानी पाटलास मुंडासे एक व सेला एक एकून ऐसी दोन सणगे दिवाणाचे तश्रीफ ह्या वेगळेठाचा नाना ९ तीन पैसे द्यावे व इनाम सेत बीघा १ एक मुलकामध्यें जिकड भक्त आस्तील तीकड गुरव गेलीया पा। व चौगुले यानी यामध्ये मन न घालावे ऐसे आहे त्यास कोणी दिकत करील तो कासीमध्ये मात्रागमन व सुरापान करील मुशलमान मोडील त्यास सोराची आण व ब्राह्मण मोडतील त्यास गायत्रीची आण ऐसेप्रा। आहे हे लिहिले सही येणे प्रा। हक करोन दिल्हा आसै.
गोही ही॥ सखो रंगनाथ
सुभानजी पाटील पाले केदारजी पाटील बुजे-रत्नागिरी
रामजी पाटील गिरोली राणोजी पाटील मालेकर
सुभानजी देवलकर खनोजी पाटील आरलेकर
खंडोजी पाटील कंकेलेकर
सुभानजी पाटील जाखलेकर