Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)

फलटण

लेखांक २७५                                                      श्रीभवानीशंकरप्रसन्न                                                                             १४२७                                                                                  

श्रीमंत महाराज जयपालसुत वणंगपाल नाईक निंबाळकर सरकार परगणे फलटण -

प्रा। बाबा शेटी वसंत शेटी व सारंगशेट सोनार कसबे मजकूर सु॥ सन ९०५ बेशमे पत्र करून दिल्हे जे --

आमचे सर्व नायकांचे मुतने कापून आमचे सर्व राज्य चोथ्यांनी घेऊन राज्य करू लागले. ते वेळी आमची मातोश्री गरोदर होती तिला. तेथील हणमंतजी परीट याने पाठीसी बांधून रात्रीची त्यांनीं मौजे निंबळकचे रानांत डोंगराचे सुळक्यात ताकुबीर बोवा याचे समाधीत नेऊन ठेविले. तेथेच प्रसूत जाहली. त्यास आह्मी वनांत उपजलो तेव्हा आमचे नांव त्या परटाने वनंग पाळ ठेविले, तेथेच काही दिवस छपून आमची मातुश्री व आह्मी होतो. त्या परटाने बाळंतपणाची तजवीज ठेविली होती. आरण्यात कोणी मनुष्य वगैरे थारा नव्हता, तेथून आह्मास व मातुश्रीस त्या परटाने निंबळक गावी निमजाईदेवीचे देवळीं नेऊन आह्मास ठेविले. तेथेच आह्मी बारा वर्षाचे झालो आह्मास चागले कळू लागल्यावर आह्मी तेथेच राहून देवीची पुज्या अर्च्या करून तप अनुष्ठान बारा वर्षे केले एके दिवशी श्री देवीचा प्रत्यक्ष दृष्टात होऊन वर देती झाली की तू माझा खडग हातात घेऊन आता फळटणी जा; तेव्हा दोन प्रहर रात्र होती. देवीची आज्ञा घेऊन ते वेळेस रात्री एकटे फलटणास आलो, ते वेळेस रात्रीचा छबीना पाहारा- चौकीचा बदोबस्त असोन चोथ्या महालात निजला होता आह्मी सर्व पहारेकरी यास भेटून त्यास वर्तमान कथन केले की मी या गावचा राजा असोन त्याने आमचे मुतने कापले आहे, पण आह्मी देवदेशी राहिलो आहे आणि श्री निमजाई देवी प्रसन्न होउुन केली की ''तुह्मास सर्व लोक सहाय्य होतील तेव्हा तुह्मी त्या चोथ्याचे शीर कापा तुमचा फता आहे'' त्याप्रमाणे आह्मी आलो आहे आह्मास सहाय्य व्हा असा मजकूर त्याणी ऐकताच सर्व आह्मास सहाय्य झाले, नतर आह्मी महालात गेलो चोथ्या निजला आहे हे पाहून त्याजला जागे करून हातातील खङ्गाने त्याचे शीर कापले आणि त्याचे सर्व चोथ्याचे मुतने कापून त्याचे बद्दला आह्मी घेऊन आह्मी राज्य घेऊन राज्य करू लागलो, तेव्हापासोन तुझे नावाने आह्मी वर्तू ह्मणोन देवीस मागोन घेतले, तेव्हा पासोन आह्मी निंबाळकर ह्मणूननाव चावविले. आह्मी मूळचे धारचे पवार आहो हे वर्तमान मोगल बादशहा बेदर ह्यास कोणी कळवीले वरून त्याणे येथे येऊन आमचे राज्य जप्‍त करून आपले ठाणे बसवीले, आणि बेदरास कैद करून नेले, तेथे आह्मी एक वर्ष कैदेत होतो. तेथील अमीर ऊमराव मध्ये घालोन मोगलाची धाड पधरा लक्ष १५००००० एक शीक्का मोगलाची धाड भरून आमची जहागीरी सोडवीली, हा तुमचा मोठा उपकार जाणोन तुह्मास ''धाडे पतगराव'' ही कीतापत नवीन वतन करून दिल्हे आहे ते -----