Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८२ श्री १६४६ आषाढ शुध्द ७
स्वस्ति श्री राज्याभिषेक - शके ५१ क्रोधिनाम संवत्सरे आषाढ शुध सप्तमि भोम वासरे क्षत्रिय-कुलावतंस श्रीराजा शंभु छत्रपति स्वामि याणि सेटे-माहजनानी व रयानी का। उबरज पा। कराड यासि आज्ञा केली ऐसि जे कालोजी बिन जोगोजी जाधव पाटिल का। मा।र याणे स्वामिसनिध येऊन विनति केली की का॥ मा॥रची पाटीलकी महतकदीम आपली त्यास आपला गोत्र-पुरुष सटवोजी बिन शमनाजी जाधव याणे आपणासि कथला वडीलकीकरिता आरंभिला आहे आणि आपण वडील ह्मणवितो त्यास त्याचा व आपला मूळपुरुष येक वडील घर पान मान आपले ऐसे असता सटवोजी रेटाई करितो त्यास सटवोजीचे वडिलानी आमचे वडिलासि पुर्वी इदलशाही कारकिर्दीस वडीलकीकरिता कथले बहुत करीत आले परतु आपले वडिलि सटवोजीचे वडिलास वडिलकीचे पानमान घेऊ दिल्हे नाही मधे दिवाणीतून एकदोनि वेला स्थलास हि त्याचे वडील व आपले वडील निवाडियाबद्दल जाऊन स्थली मनसुबी होऊन स्थल-पत्रे आणीली तेव्हा सटवोजीचा वउील दताजी व तिमाजी खोटे जाले असता मागती सटवोजी कथले करितो या करिता स्वामीनी आपले कागदपत्र मनास आणऊन बर हक निवाडा करावा ह्मणून विदित केले त्यावरून मनास आणिता मूळपुरुष कालोजी जाधव याचा व सटवोजी जाधव याचा ऐक परतु वडील जाखो पाटील व धाकटा पाको पाटील या दोघा भावाची सतत हे दोघेजण वडीलपण पानमान नाठार जाखो पाटील याचा त्यास याचा वशज कालोजी पाटील या करिता वडीलपण पानमान नागर कालोजी पाटील याचा धाकटा पाको पाटील याचा वशज सटवोजी बीन शमनाजी याणे वडीलपण व नांगराखेरीज आपली निमे तकसीम पाटीलकी मात्र खाऊन असावे ऐसे असता सटवोजी पाटील उगा च वडीलपणाकरिता कथले करितो त्यास स्थलीची पत्रे व वरकड कागदपत्रावरून पाहाता कालोजीने मूळपुरुष भोगवटा लेहून दिल्हा त्यावरून धर्मता त्रिविधप्रकारे कालोजी जाधव पाटील का। मजकूर हा वडिलकीस खरा आहे याकरिता याणे वडीलपण पानमान नागर निमे पाटीलकीचा कारभार करून पाटीलकी अनभवावी व सटवोजी जाधव आपण वडील ह्मणऊन कथला करीत होता परतु मूळपुरुष वंशावली व भोगवटा व स्थलीची व वरकड पत्रावरून वडीलपणास लागू होत नाही धाकट्या भावाचा वंश सटवोजी याणे निमे पाटीलकीची तकसीम अनभवावी ऐसे जाले त्यावरून याप्रमाणे चालवावयाची आज्ञा करून तुह्मास हे आज्ञापत्र सादर केले असे व सविस्तर निवाडपत्र आलाहिदा दिल्हे आहे तरी तुह्मी का। उबरज येथील निमे पाटीलकी वडीलपण पानमान नांगर कालोजी बीन जोगोजी पाटील यास व निमे पाटीलकी सटवोजी बीन शमनाजी यास ऐसे हरदू जणास वंशपरंपरेने चालवावयाची आज्ञा केली असे यांत कथला होऊ न देणे या पत्राची तालीक लेहून घेऊन असल कालोजी पाटील याजवळ परतोन देणे जाणिजे निदेश समक्ष
सुरु सूद बार