Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८ १५८९
तकरीरकर्दे बे॥ मल्हार बाबाजी व तिमाजी मल्हार व त्रिंबक गोमदेऊ व रामाजी बाबाजी देसपांडिये प॥ सुपे सु॥ समान सितैन अलफ तकरीर केली ऐसी जे सामराम काटे व सभाजी काटे देसमुख व मोकदम क॥ सुपे हरदोजण कसबाचे मोहर + + दर भांडो लागले हरदोजण काजी व देसपांडिये याचे गोहीवेरी राजी जाले राजीनामे लेहोनु दिधलेयावरी आपणास सफत घालून पुसिले तरी मलिकाचे कारकीर्दीस याकूदखान यासी जागीर जाली ते वख्ती देसमुखी काटियानी घेतली यावेरी मंबाजीराजेयाचे कारकीर्दीस मोहर जाली आहे यावेरी असतखानाचे + + + + + + + देसमुखी घेतली दीढ दोन वरिसे देसमुखी कसबेकरी केली त्यावेरी मागते काटे हुजूर जाउनु देसमुखी करू लागले यावेरी शाहाजी राजे व सीवाजी राजे जागीरदार जाले तीन च्यारी वरसामधे मोहर केली असे हे लिहिले सही