Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३ १५७३ चैत्र शुध्द ७
अज रख्तखाने माहाराज राजश्री शाहाजी राजे दामदौलतहू बजानेब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि प॥ सुपे बिदानद सु॥ इहिदे खमसेन अलफ बे॥ लक्षमीधरभट बिन जाऊभट जोसी कसबे मजकूर हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम व रोजमरा बितपसील
दर सवाद क॥ मजकूर जकाती चौत्रा क॥ म॥
बागबागायत चावर एक दे॥ पैकी रोजमरा दरोज
कटुबान टके नख्तयाती त॥ रुके सा ६
१५ पंधरा ठाणे व त॥ देहाय
विष्णु हरदेऊ कुलबाब कुलकानु
कुलकर्णी प्रज जाऊ प॥
अंबराईपेंडी एक बिन नरस प॥
१ भोडवा
एणेप्रो। ब॥ फर्मान व ब॥ भोगवटे वजिरानि व ब॥ खु॥ र॥ इ। त॥ साल गु॥ भोगवटा व तसरुफाती चालत आले आहे ऐसीयास सालमजकुरी कुल इनाम इमानत करणे ह्मणौनु माहालास एकदर खुर्द खत सादर आहे त्यावरून कारकुनी आपला इनाम अमानत केला आहे तरी साहेबी मेहेरबान होउनु आपला इनाम आपले दुमाले केला पाहिजे दरीं बाब खुर्द खत होए मालूम जाले जरी भटमजकूर हुजूर आला होता याच्या इनामाची कुल हकीकत हुजूर मनास आणौनु सदरहू इनाम पैकी अमानत केले बागबागायत कटुबान व अबा पेड एक व जमीन चावर .॥. नीम व रोजमरा रुके ४ च्यारी एणेप्रमाणे अमानत केले असे हे + + + बाकी भटमजकुरास इनाम करार
रोजकीर्दीपैकी चावर नीम रोजमरा दर सवाद जकादी
०॥० चौत्रा क॥ म॥ पैकी रुके च्यारि
४
+ + + + + व प्रज व बाबेहाय
सदरहू प्र॥
एणेप्रमाणे करार केले असे सदरर्हूप्रमाणे चालवीजे दरहर साल ताजे खुर्द खताचा उजूर न करणे तालीक लेहोनु घेउनु असेली भटमजकूरासी फिराउनु देणे + + + + जेमाखान पीरजादे मोर्तब सूद
र॥ छ ६ माहे रबिलाखर
रबिलाखर