Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ १२ जिल्हेज (?) लेखांक २८. १७०१ मार्गशीर्ष व।। ११.
सन समानीन, मु॥ पट्टण. श्री. २ जानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री रावजी स्वामींचे सेवेसीं:-
पो। गोविंद भगवंत सा।। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल त॥ छ २४ माहे जिल्हेज जाणून वर्तमान यथास्थित असे. विशेषः- आपण पट्टणास पोहचून अदियाप जाब येत नाहीं. नित्य श्रीमंत विच्यारितात, अदवानीचा उपद्रव अदियाप मोकळा होत नाहीं ? नवाब निजामआलीखां यांची मर्जी अदवानीकरितां खफा आहे. इंग्रजाची मसलत मोठी. सर्वांनीं करावी. तें राहून आपले आपले घरांत व वांकडे पाहाणें, यांत कार्ये कसीं होतील? नवाबबहादर दूरंदेश आहेत. श्रीमंत राजश्री नाना व राव यांणीं नवाबांस पत्रें लिहिलीं, तें देऊन आधीं अदवानीचा हांगामा मना करून चेनापट्टणाकडे स्वारी सत्वर जावी, ह्मणजे नवाबही सिकाकोलीकडे जातील. त्यांचा सरंजाम सर्व तयारी आहे. अदवानीचा महसरा उठण्याची मात्र प्रतीक्षा आहे. आपण इतकें नवाबांसीं बोलून जरूर करवावें. करारप्रमाणें जाबसाल उगऊन सत्वर इकडे यावयाचें करावें. कितेक श्रीमंतांनीं लिहिलें त्यावरून कळेल. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.