Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
१७०१ मार्गशीर्ष वद्य १०. लेखांक २५. १ जानुआरी १७८०.
र॥ छ २३ जिल्हेज समानीन. श्री.
अदवानी तालुक्यांत आंमेहरबांकडून हांगामा आहे, एविशीं तहनाम्यांत कलम लिहिलें व वकीलासींही बोलण्यातं आलें व आपणासही कलमी केलें. त्याचा दरजाब आसाहेबीं वकीलास लिहिला कीं, हांगामा लौकरच मना करऊन अमीरुल-उमरा यांस सलूखच करितों. लेकिन ताहाल हांगामा मना जाला नाहीं. रोजबरोज तालुकियास ज्याजती इजा होत आहे, ह्मणोन अखबारेवरून जाहीर जालें. दरी सुरत इंग्रजास तंबी कर्ण्याची मसलहत मोठी. नवाब निजामआलीखांबहादूर या मसलतीस शरीक; सर्वांची सलाह तदबीर एक; अदवानी तालुका नवाबमवसूफ यांचा; त्या तालुकियांत आमेहरबांकडील हांगामा; तेव्हां नवाबमवसूफ यांची मसलतीविसीं तमा नियत कसी होईल ? सिकाकोल राजबंदरीकडे जावयाची त्यांची तयारी व जमाव जाला आहे. इंग्रज दुसरे वाटेनें अदवानीस येणार, हें नवाबमवसूफ यांस जाहीर होतांच, ज्याबज्या फौजा पाठऊन घाटबंदी केली. अदवानीचे बंदोबस्तास फौज रवाना जाली. दक्षणचे सर्व साहेब रयासत यांचा इंत्यफाक व एकदिली जाली, हें इंग्रजास इतल्ला कळतांच, मसहलत भारी पडली, ह्मणोन मुशकिलींत आहेत. त्यांत अदवानीचा हांगामा मना होत नाहीं. नवाबमवसूफ व नवाबबहादूर यांची तरफैन नामाफिकत इतकी दरज मुखालिफांस मालूम होतांच, कितेक कामांस कमती येईल. नवाबमवसूफ यांचे बेइंत्यफाकींत कबाहाती फार आहेत. दुषमानास राजकारण करावयास दरजा राहतील. उमदे रयासतींत उमदींच कामें, त्यांत फायदेही मोठेच. तेव्हां ऐशा जुजकामाकरितां नवाबमबसूफ यांची नाखुसी येणे हें सलाह वख्त नाहीं. बिनाबरा अदवानीचा हांगामा जलद रफा व्हावा, ह्मणजे नवाबमवसूफ यांची खातरजमा होऊन सर्वत्रांची एकदिली जालीयाचा दाब दुषमनावर पडून, नेमल्या मसलतीस जिल्हे व खलक येईल. मोहीमेचे दिवस न्याहायत कम राहिले. पल्ला थोर. सर्व दरजे व दूरंदेशीचे मरातब आसाहेबांस जहननिसी आहेत. कलमीं करावें ऐसें नाहीं. अदवानीचा हांगामा मना करऊन आपण चेनापट्टणच्या जिल्ह्यांत जुद नमूद व्हावें. नवाबमहसूब अदवानीचा बंदोबस्त करून सिकाकोल राजबंदरीकडे जातील. सरकारच्या फौजा गुजराथ प्रांतीं रवाना जाल्या. सरदारांचीही तयारी आहे. थोडकेच दिवसांत जातील. खंडोजी भोंसले यांची फौजेची जमाव जाला. याउपरीं बंगाल्यांत जातील, इकडील कराराप्रमाणें कोणताही गुंता नाहीं. कृष्णराव नारायण व नरसिंगराव वकील पट्टणास पावले असतील. त्यास मुफसल कलमी केलें आहे. त्या बयान करतील त्यावरून जाहीर होईल. ह्मणोन हैदरआलीखांबहादूर यांस नानांचे नावें पत्र.