Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ २० रजब सन इहिदे लेखांक १५०. १७०२ ज्येष्ठ व॥ १.
समानीन, आषाढ मास. श्री. १७ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
पो॥ बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष. तुह्मीं जेष्ठ शुध प्रतीपदेचें पत्र पटणचें मुकामचें पाठविलें तें शुध चतोर्दसीस पावलें. राजश्री परशरामपंतभाऊ फौजसुद्धां सरकारांतून करवीरकरांचे पारपत्यास रवाना जाले. त्यांचीं ठाणीं घेऊन कितूरकरावर दौड करून गोकाकेस वेढा घातला आहे. नवाबसाहेब यांचे तालुकियास उपसर्ग दिल्हा, नरगुंदकराचे कुमकेस रामदुर्गाकडे चार हजार फौज पाठविली. व येडगल तालुके मजकूर इकडेही स्वार पाठविले आहेत ह्मणोन धारवडेहून वगैरे चहूंकडून बातमीचीं पत्रें आलीं. त्यावरून नवाबसाहेब यांणीं आह्मांस बोलावून पत्रें दाखविलीं. आणि बोलिले कीं:- मदारुलमाहाम यांचा आमचा स्नेह होऊन इंग्रजाचे मसलतीस नमूद जालों असतां परशरामराव यांणीं दंगा करावा कीं काय ? किरकोळी गोष्टीकरितां दिलांत खतरा राहणें हें ठीक नव्हे; ऐसें बोलिले. त्यांस आह्मीं जबाब दिल्हा कीं:- कोल्हापुरकर व कितूरकर याणीं सरकार तालुकियांत बेकैदी केली सबब फौज रवाना करणें जरूर. आपले तालुकियांत फौजेमुळें कमपेश पडले असलिया मदारुलमाहाम यांस आह्मी पत्र लेहून पाठवितों; ह्मणजे त्यांस लेहून बंदोबस्त करवितील. यास्तव भाऊंस लेहून नवाबसाहेब यांचे तालुकियास उपसर्ग न होय तो अर्थ व्हावा. ह्मणोन विस्तारें लिहिलें. ऐसियास, येसाजी सिंदे व सटवोजी भोंसले वे मानाजी फांकडे त्रिवर्ग एक होऊन सरकारतालुकियास बहुत उपद्रव केला. गांव मारले. पाटील धरून नेले. ऐसें जाणून राजश्री परशरामपंत यांची रवानगी फौजसह त्यांजवर केली. मशारनिले यांणीं जाऊन, त्यांची मातबर तीन चार ठाणीं घेतलीं. पुढें बंदोबस्त करावा तों कितुरकर गोकाकेस जमाव बांधूं लागला व शाहापूर वगैरे सरकारतालुका मारला. पुढें जमाव धरितो जाणून त्यांजवर दौड पाठविली. फौजेनें गोकाकेस मोहसरा केला. भाऊंही जाऊन पोंहचले. नंतर कितूरकर याणें कौल घेऊन येऊन भेटला. हें वर्तमान पेशजीं तुह्मांस लिहिलेंच आहे. फौजा गोकाकेकडे गुंतल्या ऐसें समजोन सलूख्याचा पैगाम लाविला असतां सिंदे व फांकडे, भोंसले यांणीं जमाव फिरोन करून तालुकियांत मनस्वी धूम केली. जयराम स्वामीचें वडगांव दरोबस्त लुटून बोली बहुतेक नेल्या. हें वर्तमान कळतांच भाऊंनीं चार हजार फौज त्याजवर रवाना केली. त्यांणीं तिघांस लुटिलें. सडे त्रिवर्ग पळोन किल्ल्याचे माचीस गेले. कर्में करितात त्याप्रमाणें शिक्ष्याही होती. कितूरकर यांजकडील पेशकसी व सरकार तालुका दाबला, त्याचा जाबसाल होत आहे. नवाबबहादूर यांचा व सरकारचा स्नेह जाला. त्याचे तालुकियास काडीमात्र इजा न देणें ह्मणोन परशरामपंत यांस पत्रें गेलीं, व जातात. मशारनिले याणींही सरकारांत लिहिलें कीं:- इकडील तालुकियांत दोन महिने फौज फिरऊन मुपसद यांचें पारपत्य करावें ऐसें होतें, परंतु नवाबबहादर यांचा तालुका लगता. त्यास उपसर्ग लागेल. सबब फौज पाठविणें मवकूफ केलें. नवाबबहादर यांसीं दोस्ती जाणोन फौज न पाठविली. ऐसीं त्यांचीं पत्रें आलीं. तेव्हां त्यांजकडून उपसर्ग लागेल असे कसें घडेल ? अमीलांनीं व तालुकदारांनीं उगेंच गैरवाका लिहिलें असेल. यांची चौकसी करावी. दोस्ती जाली तेथें असें सहसा होणार नाहीं. येविशीं नवाबबहादूर यांची खातरजमा असावी. आईंदे सर्व जहुरांत येईल. कितूरकर व सिंदे, फांकडे व भोंसले यांचें परिपत्य करणें हेंच चांगलें. इंग्रजाचे तंबीचे ह्मणोन मसलतीवर भाऊंस इतके सरंजामीनसीं घालवावें ह्मणोन लिहिलें. त्यास, गुजराथप्रांतीं मातबर फौजनसीं सरदार. कोंकणांत इंग्रजांनीं हांगामा केला. तिकडे हुजूरच्या फौजा व गाडद रवाना जाली व वरचेवर होत आहे. भाऊंनीं जावें ऐसी दरकार नाहीं. कितूरकर यांचा जाबसाल उलगडल्यावर फौजा छावणीस येतील. तुह्मी नवाब बहादर यांसीं बोलून कोणेविशीं त्यांचे दिलांत अंदेशा न ये ऐसें कराव. सारांश, करारांत अंतर इकडून येणार नाहीं. पूर्वींच राजश्री भाऊंस लिहून पाठविलें कीं, नवाबबहादूर यांचे तालुक्यास उपद्रव लागों देऊं नये. त्याचीं उत्तरें ही आलीं. फिरोन ही तुमचे लिहिलें आल्यावरून दुसरीं पत्रें पाठविलीं. येविषई खातरजमा ठेऊन लौकर इंग्रजाची मसलत ठरल्याप्रों। व्हावी. कोल्हापूरकर यांणीं बेअदबी फार केली. तसीच कितूरकरांनींही केली. तेव्हां पारपत्य करणें प्राप्त. त्याप्रों। केलें, व करीत आहों. दोघेही फंदी व मकरी. त्यांची उपेक्षा करणें सलाहदौलत नाहीं. हें नवाबबहादूरही दौलत करतात त्यांचेही चित्तांत येईल. र॥ छ १३. जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.