Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ ६ जमादिलाखर, लेखांक १४७. १७०२ ज्येष्ठ शु॥ ८.
सन समानीन. श्रीशंकर प्रसन्न. १० जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। गोविंद भगवंत सां॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. आपण दोन पत्रें पाठविलीं तें पावून सकल अर्थ कळला. आपण गेल्यापासोन श्रीमंतांस पत्रें येत गेलीं, त्यांवरून सर्व अर्थ समजण्यांत येतात. प्रथम करारास नवाबसाहेबाकडूनच मोबदला मुलुक व एक साला खंडणीस कमी पडले. त्यास, थोर दौलत जाणून व स्नेहावर नजर ठेऊन, इंग्रजाचें पारपत्य होतें ऐसें चित्तांत आणोन, कबूल करून करारनामा व मदारुलमाहाम यांचीं वगैरे खातरजमेचीं पत्रें पाठविलीं. त-ही प्रथमच दिवस. सर्व ह्मणतात कीं, नवाबबहादर इंग्रजावर जात नाहींत. एवढी मसलत एक सिंदे यांचे पत्रांकरितां तटून राहील कीं काय ? श्रीमंतांचा मुख्य करारनामा सिक्यानसीं जाला तेव्हां राहिलें तें काय ? ऐसें असोन, दिकती निघतात. तेव्हां मसलत करावयाची नाहीं, ऐसी चर्चा लोक करतात. वद्य त्रयोदसीस निघतील हा भरवंसा मदारुलमाहाम यांस फार होता. तों मुहूर्त तो राहिला. श्रीमंतांचा व नवाबसाहेबांचा स्नेह असा माघें कधीं जाला नाहीं. याप्रमाणे योग घडून आला. तेव्हां, नवाबबहादर यांणीं बेशक इंग्रजावर जाऊन पडावें. तेव्हां यांचीही खातरजमा पक्की जाली आणि आपले नवाबबहादर पुर्ते सोबती जाले, ऐसें होईल. यांची त्यांची एकरंगी आणि पुर्ता सोबतीपणा जाला ह्मणजे यांत उभयपक्षीं कितीं कामें आहेत आणि काय काय नफे आहेत, हें पुढें समजेल. कितेक दुषमानांस विचार पडेल. ऐसे ऐसे मसलतीचे पल्ले व दुरंदेशी सोडून किरकोळी कल्पना निघतात, यास कसें करावें ? राव रास्ते व कृष्णराव यासारखे मधेस्त; राजश्री पाटीलबावा यांचें पत्र आलें ते थैलीच श्रीमंत राजश्री नाना यांणीं रवाना केली. पावली असेल. आतां आळस न होतां इंग्रजावर नवाबसाहेब यांणीं जावें. सलाहमसलत एक तेव्हां तमाशबीनीसारखें लौकिकांत न दाखवावें. दिवस निपट थोडे. जलदीस मोल आहे. स्वारी निघण्यास उशीर नसावा. तुह्मीं करारप्रमाणें कामें उगऊन लौकर यावें. निंबाळकर यांजकडील वरातेच्या ऐवजाविशीं आपण लिहिलें. त्यास, अदियाप ऐवज वसूल नाहीं. याउपरी निकड करून ऐवज उगवितों. दिवसगत मात्र लागली व लागेल. परंतु ऐवजास चिंता नाहीं. आपण गेल्या कार्याचें यश घेऊन जलद यावें. सरकारांतून खर्चास पाठविलें. पावलें असेल. सविस्तर राजकीय वगैरे श्रीमंतांचे पत्रीं वरचेवर लिहिण्यांत येतच आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.