Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सोळावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५८.
श्रीगेवंढे प्रा। १२ शक १७०१ वैशाख वद्य ५.
'' बिदाणे इनाम राजरी बावाजी बिन नारायणजी जुंझारराव मरळ देशमुख ता। कानदखोरे यांचे इनाम मौजे गेवंढे ता। मा। एथें आहे, त्याची बिदाणे श्रीचा आंगारा बादनाक व मातनाक बिन धाकनाक व धारनाक बिन राधनाक माहार मौजे मा। यांणीं सत्य स्मरोन सांगितले. शके १७०३ प्लवनाम संवछरे वैशाख वद्य पंचमी शनवार सन इहिदे समानीन मया व अलफ.
राईचे पूर्वेस कानदजी सींव धुर कानदचे सीवेने काळंबीची सींव-
गवंडावर खडक आहे, त्याचे धारेस दक्षणेस गेळेगाणीची
पुढें सींव पावेतो राईच्या वाहाळ.
खालता धुर गवंडकड्यावरी
आहे. त्याच गवंडाने
गोवंडावर नांदुरखीचे झाड
त्याचे खालता गोवंड तो
खाली उत्तरेस राईच्या खाली
घलईच्या कड्यापासून
वागजाईच्या उत्तरेस केलाचे
झाड, त्या खाली सुमारे
कड्याची सींव गेली आहे.
एणे प्रो। बिंदाणे पूर्वापार होती. त्या प्रा। माहार मौजे मजकूर यांणीं दाखविली असेत. छ १८ जमादिलावल.''