Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सोळावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५२.
श्री.
१६५० वैशाख शुध्द १२.
'' आज्ञापत्र समस्त-राजकार्य-धुरंधर-विश्वासनिधी-राजमान्य-राजश्री नारोपंडित सचिव ता। मोकदम मौजे पाबे ता॥ कानदखोरे सुहूर सन समान अशरैन मया अलफ. मौजे मजकूर देशमुख ता। मजकूर याकडे इनाम आहे. ऐशास मौजे मजकुरीं कामथ खाचरे दिवाणांत अमानत होतीं, त्याविशीं नारायणजी जुंझारराव देशमुख ता। मजकूर याणीं दिवाणांत दरबदली करून, आपणाकडे करून घेतली. त्याची पत्रें हुजुरचीं व जिल्हेकडील त्याजवळ असतां तुह्मी कटकट करितां; खांचरे त्याजकडे सुरळीत चालवीत नाही ह्मणोन हुजुर विदित जाले. ऐशास दिवाणांतून खांचरे नारायणजी जुंझारराव यांचे दुमाले केली असतां, तुह्मास कथला करावयास संमध काय ? हाली हे आज्ञापत्र सादर केले असे. तरी याउपरी तुह्मी नारायणजी जुंझारराव याजपासी खांचराविसी कथला न करणें. येविशीचा फिरोन बोभाट हुजूर आलिया ताकीद होईल; हे बरे समजोन वर्तणूक करणें. जाणिजे. छ १० सवाल पा। हुजूर.''
सुरुसुद.
लेखांक ५३.
श्री.
१६५० वैशाख शुध्द १४.
''आज्ञापत्र राजश्री लक्ष्मण त्रिंबक तांबे मोकदम मौजे पाबे त॥ कानदखोरे सु॥ समान अशरीन मया अलफ. मौजे मजकूर राजश्री नारायणजी जुंझारराउ देशमुख ता। मा। यांकड मौजे मजकूर इनाम गाव आहे. ऐसियासी मौजे मजकूरची खाचरें दिवाणांत अमानत राहिली होती. याकरितां नारायणजी जुंझारराउ यांणी दिवाणांत रदबदल करून, राजश्री स्वामींची पत्रें जिल्हेची पत्रें करून खाचरें आपले दुमाला करून घेतली. ऐसे आतां तू खाचराविसी यांसी कटकट करितोस ह्मणोन विदित जालें. याउपरी खाचरासीं कटकट न करणें. फिरोन बोभाट येऊ न देणे. बोभाट आलिया मुलाहिजा होणार नाही. ऐसे पस्ट समजोन वर्तणूक करणें. छ १२ सवाल.''