Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सोळावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६३.
श्री.
'' श्रीमत् माहाराज मातुश्री आईसाहेब यांणीं बावाजी मरळ ता। कानदखोरे यासी आज्ञा केली ऐसीजे, मौजे पाबे ता। मजकूर येथे सरकारची सेरी पुरातन आहे. त्यास, तुह्मी इजारा सेरीचा रुपये ५० पनास सालाबाद देत असता. हालीं हुजूरचे कमाविसदाराकडे देत नाही. ह्मणून हुजूर विदित जहालें. ऐ॥ यास सेरीचा ऐवजास खलेल करावयास गरज काय ? याउपरी देखत आज्ञापत्र सदरहू ऐवज हुजूर पाठवणे. उजूर जालिया कार्यास येणार नाही. या कामास सिदोजी मुलिक पा। आहे. यासी मसाला रुपये १ देणे. जाणिजे. छ ४ माहे जिल्हेज सु॥ अर्बा खमसैन लेखनावधी.''
बार
लेखांक ६४.
श्री.
'' राजश्री बाजी साबाजी यसवंतराउ पासलकर देशमुख
ता। मासेखोरे गोसावी यांसी :-
॥ ε अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य श्नो नारायणजी जुंझारराऊ देशमुख ता। कानदखोरे सु॥ समान सलासैन मया अलफ कारणे तुह्मास सवादपत्र लेहून दिल्हे ऐसेजे, देशकुलकर्णी ता। मा। याचा व आमचा इनाम गाव पाबी व धानब हे दोन्ही गाव ता। मा। आहेत. तेथील हकाचा कजिया होता. त्यास. राजश्री पंतसचीव स्वामीनीं किले सिंहगडचे मुकामीं आणून दोघांचेहि कतबे घेतले. आणि त्याणीं व आपण परस्तली भांडत जावे ऐसें नाहीं. ह्मणोन देशपांडे व आह्मी समजोन त्याणीं आह्मास कागद लेहून दिल्हा व आह्मी त्यासी कागद लेहून दिल्हा आहे. त्याप्रमाणे वर्तावे. ह्मणऊन राजश्री पंतस्वामीनी आज्ञा केली कीं, वर्तावयास जामीन देणें. ह्मणऊन आपण तुह्मास दिवाणांत वर्तावयास जामीन दिल्हे असे. तरी जेणेप्रमाणे आह्मी देशपांडियास कागद लेहून दिल्हा आहे, त्याप्रमाणे वर्तोन. जरी तहप्रमाणे न वर्तोन आणि नवदिगर करून त्यामुळे तुह्मास आमचा निसबत लागेल. त्याचा जाब आपण करून. छ १६ साबान. हे सवादपत्र लेहून दिल्हे सही.''