Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २९९
श्री १६४२ पौष शुध्द ७
नकल
यादि राजश्री नारो शंकर सचिव सु॥ सन अशरेन मया अलफ कृष्णाजी दादाजी प्रभु देशपांडे याचे वतन सोडून देण्याविसी एक दोन ताकिदी जाल्या असता त्याचे वतनाचा कथला वारीत नाही त्यास हाली तुमची याद आणिविली असे तरी पाठऊन देणे ह्मणजे ती याद मजकुरनिल्हेपासी देऊन वतन घेण्यास रवाना करता येईल त्याजवरून मजकुरनिल्हेचे पदरी वतन घालण्याचे ठरावाची याद पाठविली आहे देशपांडे याचे ++++++ न घालण्याची वगैरे कलमे बि॥
देशकुलकर्णाचे व गावकुलकर्णाचे वतन ता। भोर ता। उत्रोली ता। रोहिडखोरे व वेलवडखोरे येथील मा।रनिल्हेचे वतन आहे त्यापैकी आह्माकडे देशकुलकर्ण व गावकुलकर्ण आहेत ती त्याची त्याजला देऊ व त्याचे मुतालिक लोहकरे सोनटके चदीस वगैरे याजकडे गावकुलकर्ण आहेत ती त्याची त्याजला ताकीद करून देऊ कलम १ |
मा।रनिल्हेचे बाप दादाजी नरस प्रभु याणी अवरगजेब याचे घामघुमीत कागदपत्राचे रुमाल सर्ज्याराव देशमुख ता। भोर याजकडे ठेविले आहेत ते त्याचे त्याजला देऊ कलम १ मा।रनिल्हेचे समजुतीस जेधे देशमुख व घोरपडे देशमुख व ढोर देशमुख पाठविले ह्मणजे ते समजूत करितील ह्मणोन आज्ञा त्याप्रो। त्रिवर्ग पाठविले आहेत समजूत करितील कलम १ |
मौजे अंगसोले ता। भोर हा गाव मा।रनिल्हेस हाशम लोक कारी वडतुबी कोरले याचे नि॥चे सबनिसी फडनिसीबदल आहे तो त्याचा त्याजला देऊ व किले राहिडा येथील चाकरी मा।रनिल्हेपासून घेऊन सभासदेची आसामी त्याची त्याजकडे चालऊ कलम १ |
आह्मी सदरहू वतनाबदल महजर वगैरे |
येणेप्रमाणे दोन्ही महालचे वतन मा।रनिल्हेचे आहे हे खरे मधे सर्ज्याराव वगैरे याणी वतन बेवारीस आहे ह्मणोन समजाविल्यावरून कैलासवासी पतानी चदीस समजाऊन आपले नावे वतन करून घेतले परतु दोन्ही महालचे वतनदार मा।रनिल्हेचे खरे नरस प्रभूचे भाऊबंद वेलवंडखोरेकर भास्करजी प्रभु खरे त्याचा पुत्र दाद प्रभु नरस प्रभूचा दत्तपुत्र खरा नरस प्रभूचे वडिल घर तेव्हा दोन्ही वतनाचा अधिकारी दादाजी नरस प्रभु खरा आहे सदरहू लिहिलेप्रमाणे मा।रनिल्हेचे वतन मा।रनिल्हेचे पदली घालू यात अंतर मजकडून होणार नाही करार छ ५ जमादिलावल ++++