Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २९६
श्रीनागेश १६४० वैशाख वद्य ६
.॥ मा। अनाम कृष्णाजी बाबाजी व येसाजी बाबाजी कुलकर्णी देहाये तर्फ भोर ता। रोहिडखोरे बि॥
मौजे करजिये १ मौजे सपानवाहल १ मौजे वावेघर १ यासि मताजी सर्जाराव जेधे देसमुख व नारो शकर व माहादाजी शकर देसकुलकर्णी ता। मजकूर सु॥ तिसा असर मया अलफ तुह्मास पुर्वी राजश्री सर्जाराव जेधे देसमुख ता। मा।र याणी नरस परभु पुर्वी देसकुलकर्णी होते त्याची अफलाद ह्मणौन सदरहू ती गावीची गावकुलकर्णे वतन दिल्हे ते तुमचे बाप बाबाजी परभु चालवीत होते त्यावरी अवरगजेब पातशाहा या राज्यावरी चालोन आले धामधुम जाली याकरिता तुमचे बाप परागदा होऊन गेले त्याउपर तुमचे बाप व तुह्मी कारीस येऊन दोन तीन साले राहिलेस आणि विनंती केली की सदरहू गावकुलकर्णाचे वतन आपल्या बापाने चालविले आहे ते आपले स्वाधीन केले पाहिजे ह्मणोन विनती केली त्यावरून तुह्मास विचारिले की पुर्वील वतनाचे कागदपत्र तुह्मापासी असतील ते दखल करणे तरी आपणासी काही कागदपत्र नाहीत गाव आपले हवाला करावे ह्मणोन त्यावरून सदरहू कुलकर्णे तुमचे हवाला केली असेत वंशपरंपरेने चालऊन या गावीचा हकलाजिमा व घरजागा पानवाहलेत पुरातन चालिला असेल तेणेप्रमाणे खाऊन वतनाची चाकरी करून सुखरूप राहाणे जाणिजे छ १९ जमादिलाखर