Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २९८
श्री १६४१ वैशाख वद्य ८
नकल
यादी वाटनी राजश्री नारो शंकर व माहादाजी शंकर गांडेकर सुहूर सन तिसा अशर मया अलफ कैलासवासी शंकराजी नारायण याणी माहादाजीपत दत्तपुत्र घेतले पुढे औरस पुत्र नारोपंत जाले त्या उभयतामधे कथला पडू लागला सबब मातुश्री येसूबाई याणी चौघास बोलाऊन उभयतांची समजूत करावी त्यावरून उभयतांनी चालावयाची कलमे
सचिवपद दौलतीचा अधिकार नारो शंकर याणी करावा दौलतपैकी हिसा निमे ह्मादाजीपंत मागतात परतु हे कलम सरकारी आज्ञेचे त्यास हुजूर ठरेल त्याप्रमाणे उभयतांनी चालावे दरम्यान तंटा करू नये कलम १ |
रोहिडखोरे वेलवंड खोरे येथील देशकुलकर्ण नवीन संपादित आहे त्यास दोनी खोरियाचे वतन ह्मादाजी शंकर याणी खावे नारो शंकर याणी मागू नये कलम १ |
सावोत्रा वगैरे वतनी बाब दौलत समधे आहे ती नारो शंकर व माहादाजी शंकर याणी निमे निमे महाली खर्च वजा जाऊन घ्यावी कलम १ |
दादाजी नरस प्रभु याचा कथला देशकुलकर्णासी रोहिडखोरे वेलवंडखोरे याबद्दल हुजूर पडला आहे त्यास कृष्णाजी प्रभू हरहुनेर कबजेत आणून उभयतानी एकविचारे राहून बोलावे प्रभु न थकल्यास त्याचे त्यास द्यावे लागेल सबब हिसे केले नाही कलम १ |
वडिलाचे वेळेचे दागिनी जवाहीर व नख्त सोने रूपे कापड वगैरे एकदर चीजवस्तसुधा निमेनिमे उभयतानी घ्यावी शामजी हरी सुभेदार याणी मातुश्री येसुबाई यास शफतपूर्वक पुसून वाटणी करावी त्याप्रमाणे उभयतानी चालावे कलम १ |
दौलतीचा कारभार माहादाजीपंतानी कारकून व लोक हाताखाली घेऊन करावा हुजूरचाकरी वगैरे बंदोबस्त ठेवावा कलम १ उभयतानी एकविचारे चालून मातुश्रीचे आज्ञेत राहून लौकिक राखावा कलम १ |
एकूण कलमे सात सदरी लि॥ आहेत त्याप्रो। निष्कपट चालून एकाएकाचे मर्जीनी वागावे दौलतीची वाटणी निमे निमे करून घ्यावी परतु किले व मुलुक सरकारी मामलती समधे आहे सचिवीस सरजाम व इनाम वगैरे आहे त्यास हुजूर सातार्याहून माहाराज आज्ञा करितील त्याप्रमाणे चालावे वरकड कलमे सदर लिहिलेप्रमाणे निमे निमे घ्यावी उभयतानी तटा न करिता एकविचारे चालावे छ २१ जमादिलाखर
→ पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
(हुजूर सातारियास याद समजाविली तिची नकल घेतली असे दफ्तरातून सरकार परवानगी राजाज्ञा व सुभेदार यास सरकारातून प्रभूचे वतन कसे दिल्हे ही अडती लाविली तेव्हा त्यास दाखविली)