Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १२
श्री १६०७ ज्येष्ट वद्य १३
तालीक बंद ५/४ च्यार
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके क्रोधनामसंवत्सर
ज्येष्टबहुल त्रयोदशी भृगुवासर सुरसन सीत समानीन अलफ करणे जाहाला निवाडा ऐसा जे माणकोजी बिन राहूजी जगदळा पटेल मौजे शिराडे ता। उबरज यामधे व शिवाजी नाईकडा व नरसोजी नाईकडा कुणबी मौजेमजकूर यामधे मौजेमजकूरचे निमे पटेलगीचा वेव्हार लागोन माणकोजी जदळा पटेल याचा भाऊ माहादजी पटेल का। मसूर ता। मा।र हुजूर येऊन विदित केले की मौजेमजकूरची पटेलगी आह्मा जगदळियाची वृत्ति कदीम सालाबाद पहिलेपासून चालत असता लाइणी शिवाजी नाईकडा निमे पटेलकीसी कथळा करितो तरी स्वामीनी त्याचा व आपला बरहक्क निवाडा केला पाहिजे ह्मणोन विदित केले त्यावरून राजश्री कोनेर रगनाथ मुख्य देशाधिकारी प्रा। कर्हाड यासि आज्ञापत्र सादर केले की माणकोजी जगदळा पाटील याला तुह्माजवळी पाठविला असे शिवाजी नाईकडा यासि हि सुभा बोलाऊन घेऊन हरदोजणाचा जमान घेणे आणि देशमुख व देशकुळकरणी व हमशाही गावीचे मोकदम व मौजे मजकुरीचे बलुते ऐसे वृध वृध जमा करून श्रीचे देवालयी नेऊन त्यास सतय घालून विचारणे की मौजेमजकूरची पटेलकी कदीम वृत्ति कोणाची भोगवटा कोणाचा कैसा किती दिवस चालिला आहे हे साग वर्तमान सत्यपूर्वक सागतील त्याचे साक्षपत्र व त्याचा निशानानसी व त्यावरी तुह्मी आपली मुद्रा करून साक्षपत्र व हरदो वादी ऐसे हुजूर पाठवणे मनास आणून बरहक्क निवाडा करून निवाडपत्र व राजश्री स्वामीचे आज्ञापत्र सादर होईल तेणेप्रा। वर्तवणे एकाचा आकस व कोशीस सर्वथा न करणे परनिष्ठ जैसे असेल तैसे लिहिणे ह्मणोन पत्र सादर केले होते त्यावरून कोनेर रगनाथ यानी माहाली हमशाही शिवधडे पाटील व मोख्तसर भले लोक व मौजेमजकुरी बारा बलुते ऐसे कसबे पेठ ता। कोडुली येथे जमा करून हरदोजणा वादियाचे राजीपणे राजीनामे लेहून घेऊन हमशाही पाटील व मोख्त३सर भले लोक व बारा बलुते यासी श्रीकृष्णेची क्रिया व सत्य घालून व आपले बेताळीस स्मरोन बरहक्क गोही देणे ह्मणोन त्यास सत्य घातले त्यावरून त्यानी साक्ष दीधली त्याचे साक्षपत्र माहालीहून आले बितपसील