Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २४.
१७६५ ता. ६ सप्तंबर. श्रीशंकरवरद. १६८७ भाद्रपद वद्य ७
श्रीमत् राजश्री नाना स्वामीचे शेवेसीः-
पो चिंतो विठ्ठल व चिंतो अनंत सा। नमस्कार विनंती. येथील कुशल ता। छ १९ रबिलोवल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असिले पाहिजे. विशेष. आपणांस श्रीमंतांनीं१ इमान दिल्हें व पत्र आपले पर्वत-विषई२ (?) सरकारांत होतें तें माघारें दिल्हें. त्यास आपणासी बोलणें ते श्रीमंत बोलले आहेत. त्याप्रो श्रीमंतांनीं इमानपुरसर कृपा आपल्यावरी-करावी याविषई आम्हींहि आपल्यास वचन द्यावें, त्यास आपण श्रीमंतांचें सेवेत पूर्वीपासून एकनिष्ट आहेत, त्यास श्रीमंतांनीं जें कृपा करून इमान दिल्हें, व वचन दिल्हें आहे त्याप्रों आह्मीं श्रीमंतास विनंती करून वचन चालवावें. येविसीं आम्हापासून अंतर होणार नाहीं. आपण दुसरा प्रकार व कोणीकडीलहि संदेह चित्तांत न आणावा आणि यावयाचें करावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती.३