Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                                  पत्रांक २०.

इ. स. १७६५ ता. २ जुलै                                                      श्री.                                                          १६८७ आषाढ शुद्ध १५

पुरवणी श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे शेवेसीः-
विज्ञापना. विशेष. ‘दाहा लक्ष स्त्रो आम्ही देतों या सरदारीचा बंदोबस्त करून द्यावा. त्या दस्तऐवजावरी श्रीमंताची मर्जी लोभावर आहे. पैका घेतल्यावांचून बंदोबस्त करून देऊं नये’ म्हणोन लिहिले. ऐशास पेशजी येथील बंदोबस्ताविसीं स्वामीस वारंवार + + + आज्ञा आली ( ? ) कीं ‘जे लिहिणें ते श्रीमंत राजश्री दादासाहेब याजकडे लिहित जाणें. त्यांची कृपा जाहालियावर सर्व बंदोबस्त होईल. पेस्तर उभयतां श्रीमंत येकत्र जालियावर बंदोबस्त करून घेऊं.’ याप्रमाणें आपलीं एत्रें आलीं त्यावरोन पत्रें लिहित गेलों. त्यास ते समय आपला नक्ष राहून शत्रूचा पराभव व्हावा. या पर्यायें दस्ताऐवज (जी ? ) न सांपडतां लिहिलीं असतील. परंतु ते समयीं श्रीमंताचे मर्जीस न आलें. ज्या समयीं होणार त्या समयीं जाहाले. दस्ताऐवजीं ही पत्रें म्हणावी तर फारसी आमची नसतील. ते समयीं गणोजी कदम सिरोपस्थ होता. त्याणें-कोणाचेंही चालों दिल्हें नाहीं. *झासीचेहि कामास त्याणेच अपाय केला. त्याणें आह्मांस न कळतां हे हस्तऐवज लिहिले असतील. तो फारच बखेडखोर होता. त्यामुळें आम्हीं व बाजी नरसिंह व राघोबा पागे ऐसे एकत्र होऊन त्यास उखळून काढिला. यामुळें घरचें खूळ तुटोन हा प्रकार घडला. स्वामीचे चरणासी एकनिष्ट होतों त्याप्रमाणेंच स्वामीचे कृपेनें येश आलें. ईश्वरें हें यश आपल्यास दिल्हें आहे. त्याचा शेवट स्वामींनींच येश घेऊन केला. त्या रीतीनें या सरदारीचा बंदोबस्त क + + + मर्जी लोभावर आहे त्यास थोडक्यासाठीं मर्जी खट्टी होत असेल तर न तोडावी. आपणांस कळेल त्या रीतीनें चार पांच यावर अधिक उणे करार-मदार करून ज्या गोष्टीनें माहादजी-बावाचा या सरदारींत कुरूप (?) राही व आपले दिवाणगिरीचें स्वरूप राहे, या रीतीचा निर्वेधपणें बंदोबस्त करून घेतला पाहिजे. आपले अज्ञेसिवाय दुसरा अर्थ येथील नाही. येथील कोट्याचा दारमदार जाहालियावर उदेपुरास जाऊं. दोही संस्थानच्या खंडण्या (?) तूर्त थोडा बहुत ऐवजहि पाठवितां सरकारांत मदार होईल. याप्रों कांहीं तूर्त व कांहीं मुदत करावी. मोरो विठल यास माघारें लाविलें म्हणोन चिंतोपंतास विषाद येईल. त्यास मातुश्रीचा आग्रह पाहिला. प्रथम मातुश्रीची मर्जी न रक्षिली. तेव्हां इतकी आग लागली. तिणें मकारनामासारिख्यास ऐसे खेळ करून बाईच्या विचारांत तो न राहिला तेव्हां सेवटीं ऐसी जरब दिली, मग आमचा विचार किती ? सध्यांच मोरोपंतास ठेवावें तर खुळ तुटलें ते मागतीं उभें राहातें, यामुळें तूर्त मातोश्रीच्या रंगांत मिळान तिच्या मनोदयाप्रों मोरोपंतास जाऊं दिलें. परंतु मारनिलेसी जातेसमयीं आम्हीं त्या xxxxx गोष्टी कित्येक बोलिलों आहों ते सविस्तर आपणांस सांगतील. यावरून कळेल. सारांप, चिंतोपंतांनीं आपलेविसी निखालस असावें. राजश्री महादजी बावा व आमचें स्वरूप राहे आणि उभयतांचे नांवे खातरजमेचीं पत्रें येऊन या सरदारीचा बंदोबस्त होय ऐशा रीतीनें त्यानीं निखालसपण करावें. येविसीं स्वामी त्यासी बोलून करारमदार करितील त्याप्रमाणें आम्ही वर्तणूक करूं. परंतु त्याचेंच मात्र निखालसपण जाहालें पाहिजे. गुदस्तां आह्मांजवळ वचन प्रमाण येक देत. माहादाजी गोविंदास वचन येक देत. ऐसे करून आपले दिवाणगिरीस व या सरदारीस त्यांणी अपाय केला. तेव्हां वचनाचीहि शाश्वतता कैसी वाटेल ? यास्तव याचा पुर्ता बंदोबस्त करून घ्यावा. मग त्यासी बोलणें तें बोलावें. कळलें पाहिजे. झासी वोडसेवालियानें घेतली आहे त्यास श्रीमंत या प्रांतांत येणार असले तर सहजांतच आपलें येणे होईल. नाहींतर आपण फौजसुद्धां यावयाचे करावें. सिंदे होळकर एकत्र होऊन बुंदेलखंडांत छावणी होईल. आपण आलियावर, दोन्ही तिन्ही फौजा एकत्र जाहालियावर, झासीचाहि फारसा xxx कडे गेली हें उत्तमच आहे. त्या xxxxx से मारिले ह्मणजे सहज किल्लाहि सुटेल. त्यास आपण आलियावर आपले प्रतापें सहजांत कार्य होईल. ऐसा प्रकार आहे. स्वामीस कळावें. वरकड सविस्तर राजश्री विष्णुपंत व धोंडोबा नाईक सांगतील त्यावरून कळेल. देसचें कमाविसदारास ताकीदपत्रें येथून पाठविलीं आहेत. जो आज्ञेप्रों पैका देईल त्याजला ठेववलें जाईल. दुसरा करावा (?) तों कोटियाची मामलत जालियावर दोन लाखाची तजवीज करून इंडिया पाठवून देतों कळों दिजे हे विज्ञापना.