Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)
पत्रांक २२.
इ. स. १७६५. ता. १७ आगष्ट श्री. १६८७ भाद्रपद शु. १
श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः-
पोष्य राघोराम व राघोमल्हार व बाजी नरसिंह कृतानेक सां। नमस्कार. विनंती येथील कुशल ता। भाद्रपद शुद्ध १ मुक्काम लष्कर नजीक मुकुंदबारी जाणून स्वकीय निजानंदलेखन आज्ञा केली पो।. विशेष. बहुत दिवस जाहले. परंतु पत्र पाठवून सांभाळ न जाला; तर ऐंसी ममता निष्ठुरता सहसा न पों। सदोदित प्रेषित पत्रीं मोद(दा? )वाप्ती केली पो।. इकडील वर्तमान तरः कोट्याची मामलत जाली. मारवाडचीही मामलत चुकली. आतां दरकूच राजश्री मल्हारजी-बावाकडे जात आहों. त्यास प्रस्तुत पुण्याचीं पत्रें राजश्री शिवाजी विठ्ठल यांची आलीं. त्यांत मजकूर कीं “राजश्री माहादाजी गोविंद याचें वर्तमान श्रवण करून श्रीमंत राजश्री दादासाहेब अद्यापवर क्रोधायमानच आहेत. ऐसें संधींत राजश्री गणोजी कदम वे राजश्री अंताजी नाईक व नाना पालेकर ऐसें त्रिवर्ग राजश्री मोरोपंताचे१ सूत्रें करून राजश्री चिंतोपंत२ साह्यभूत करून श्रीमंत राजश्री माहादाजीबावाचे सरदारीचे राजकारण सिद्धीस नेऊं म्हणतात. नजराण्याची ही भानगड त्याचेंच अनुमतें करून बोलत आहेत. आणि तेथें श्रीमंतापाशीं करार करीत आहेत कीं ‘राजश्री माहादाजी बावास आणून भेटवितों’* म्हणून सिद्धांतयुक्त जाबसाल करीत आहेत”३ म्हणोन अनेक प्रकारें तपशीलवार पंत-मा।रनिलेनीं लेखन केलें आहे. त्यांसीं नानासाहेब ! आपण प्रसंगी असतां व राजश्री विष्णुपंत बाबा असतां, गकारनामकानें४ दरबारी पेष५ होऊन स्वामीचे हातचें राजकारण असतां त्यानें यश्याचें अधिकारी होवें हें उत्तम कीं काय ? आम्ही व आमचे येजमान आपले म्हणवीत असतां गकारपूर्वकानें मधींच लबाडी येथील पत्र नसतां करावी आणि आपण सिद्धीस जाऊ द्यावी हें उत्तम नाहीं. गंकारनामक तेथें म्हणत आहे कीं ‘राजश्री पाटीलबावा आमच्या अंत्रांत६ आहे मी त्यासी आणवून भेटवितो’ ऐसें म्हणत आहे, तर स्वामी-दरबारी७ त्याजकडून राजश्री पाटीलबावा आणावयाचा वायेदा करून निश्चयें हाच करावा की ‘जर वायेद्यास आणून भेटविले तर तूं बोलतोस तें सर्व प्रमाण नाहींतर लबाड आहेस’ ऐंसा अपवाद आणून८ माझी दरबारीं पुरकस९ होये तो अर्थ योजिला पो।. राजश्री पाटीलबावांनीं तर पांच सात वेळां श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीस व राजश्री बापूस व राजश्री कृष्ण१०रावजीस वगैरे सर्वत्रांस साफ लेहून पाठविलें स्वदुस्तरें करून की ‘आम्हीं कांहीं गणोजीस जाबसालास पाठविलें नाहीं.