Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तेरावा (थोरले माधवराव)

                                                                  पत्रांक १९.

इ. स. १७६५ ता. २० जून                                                     श्री.                                                          १६८७ आषाढ शुद्ध २

श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे शेवेसीः-
पोष्य राघो राम व राघो मल्हार व बाजी नरसिंह कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. येथील कुशल ताग इत छ १ माहे मोहरम मुक्काम नजीक मुकुंदबारी येथें यथास्थित जाणोन स्वकीय कुश्ळोत्तर-लेखन-आज्ञा करीत असावें. यानंतर इकडील वर्तमान तरी रोज गुदस्तचीं पत्रें आहेत त्याजवरोन साकल्य अर्थ ध्यानास येईल. सरतेशेवटीं राजश्री अच्युतरावजींहीं लेखन केलें आहेच. सारांश विनंति वारंवार हेंच पत्रीं माहादजी गोविंद याचें पारपत्यें व्हावयास कारण मुख्य दिवाणगिरीचे अटीमुळें हें त्याजला व्यसन प्राप्त जालें. स्वामीचीही आज्ञा होती त्याचप्रमाणे घडोन आलें. स्वामी म्हणतील कीं आम्हीं प्राणपावेतों आज्ञा केली नव्हती. त्यास आह्मीही प्रयत्न करोन मारावें हाही प्रकार नाहीं. याचा परिहार पूर्वपत्रीं साकल्य लेखन केलें आहे. अस्तु होणार कांहीं चुकत नाहीं. सारांश स्वामींनी या गोष्टीचा साभिमान धरोन आपला पक्ष हे पुरते समजोन, सरदारीचा बंदोबस्त करून घ्यावा. यांत आपलाही नक्ष आहे. राजश्री विष्णुपंत आबांनी पत्रें लेखन केलीं होतीं. तेथ मजकूर की; ‘राजश्री नानानीं आह्मीं मिळोन हा उल्लेख केला. त्यास सहालक्षपर्यंत पाहिजेत.’ त्यांनी नित्य ( ? ) देशांचे कमाविसदारांस ताकीद पत्रें दिल्हीं आहेत त्याजपासून ऐवज घेऊन बाकी देणें राहील त्याची निशा आपण करोन आह्मावरी चिठ्या कराव्या. येथें आम्ही सरबरा करून देऊं. फडणिसीचा प्रकार तरी द्रव्येकरून जेथवर येईल तेथवर करावे. येविशा पूर्वपत्रीं सविस्तर लेखन केलें असें. कळेल तो प्रकार करून उभयतां श्रीमंतांचीं कृपा संपादून घेणें हें धनीपणाचें कृत्य आपल्या कडेसच आहे. आम्हीं चाकरी मात्र आपण सांगतील ते करावी. सविस्तर वर्तमान पूर्व पत्रावरून कळो येईल. सेवेशी श्रुत होय. हे विज्ञापना.