Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्री.

लेखांक ७५.

१६८७ कार्तिक शुद्ध ७.

अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री हरबाजीराम दि॥ सिंदे गो॥ यांसि :-
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार. सु॥ सीत सितैन मया व अलफ प॥ शाहाजापूर व बडवंदे व उमरगड वगैरे महाल तीन सिंद्याकडून तुह्मांकडे कमाविसीस आहेत. त्याची जप्ती सरकारांत करून रसद घ्यावी लागती. याजकरितां तुमचें प्रयोजन हुजूर असे. तरी देखत आज्ञापत्र हजूर येणें, दिरंग न लावणें. या कामास स्वार दि॥ गणोजी कदम पाठविले आहेत. तर यास मसाला रुपये १००० येक हजार देविले असत. तर आदा करणें. जाणिजे. छ ५ जमादिलावल. आज्ञाप्रमाण.

(लेखनावधि:)