Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक ७३.
१६८७ भाद्रपद वद्य ११ प्रथम.
राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि :-
उपरी. तुम्हीं पूर्वी पत्र राजश्री भिकाजी नाइकाबा। पाठविलें तें पावलें. त्यावरून सविस्तर वृत्त कळलें. त्या पत्राचें उत्तर पूर्वींच रवाना जहालें त्यावरून सर्व तुम्हांस इकडील भाव कळलेच अस्तील. प्रस्तुत बलरामानें पत्र लिहिलें होतें. त्यांत आशय होता कीं, विठ्ठलरायाबा। निराळीं पत्रें तीर्थस्वरूपांस येतात हें काय ? म्हणून तुमचा आशय बलरामानें लिहिला. त्यास, पत्र कांहीं निराळें राजकारण राखावें, आशय कळावा, याअर्थें पत्र येथून गेलें नाहीं. येथील इतबार सर्व तुम्हांवरच आहे. पत्र द्यावयाचें कारण हेंच कीं, पहिले लहानमोठा निरोप सांगून पाठविणें तरी याजबा। पाठविण्यांत येत असे, त्यावरून त्याणेंच होऊन पत्र येथून नेलें आहे. आणिक कांहीं प्रकार नाहीं. दुसरें, तेथें तरी येथील खातरजमेचा मनुष्य कोण आहे त्यास पत्र लिहावें ? सारांश गोष्ट हेच कीं, संदेह वारंवार न घेणें. जाणिजे. छ २३ रबिलोवल. बहुत काय लिहिणें ?